माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांची मागणी
*💫सावंतवाडी दि.०१-:* शहरातील बाहेरचा वाडा हा परिसर दाट लोकवस्तीचा असून, या भागात अद्याप लसीकरण संदर्भात योग्य अशी जनजागृती झाली नाही. तसेच या भागात अनेकांकडे मोबाईल नसून, अनेकांना ऑनलाईन नोंदणी कशी करावे याची कल्पना नाही. त्यामुळे बाहेरचा वाडा परिसरात लसीकरणाची सोय उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे. तसेच जिल्ह्यातून कामानिमित्त परजिल्ह्यात, पर राज्यात जाणाऱ्यांसाठीही कॅम्प आयोजित करण्यात यावा अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष जावेद शेख, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष शफिक खान, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अर्षद बेग आदी उपस्थित होते.
