Headlines

Global Maharashtra Breaking News

तळवणे नं. ०२ ची विद्यार्थिनी अंतरा मठकर जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत प्रथम…

जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.२९-: तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नं. ०२ ची इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अंतरा बापू मठकर हिने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय गोळाफेक स्पर्धेत मोठ्या गटातून प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे व गावाचे नाव उज्वल केले आहे.अंतरा हिच्या या कर्तृत्वाचा गौरव म्हणून जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांच्या हस्ते…

Read Full News

काजू बागेत चोरी; १.१२ लाखांचा मुद्देमाल लंपास…

⚡कणकवली ता.२९-: तालुक्यातील फोंडाघाट-खैराटवाडी परिसरात काजू बागेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विजय शंकर मुळेकर (वय ५८, रा. फोंडाघाट, पिंपळवाडी) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादीनुसार, मुळेकर यांच्या मालकीच्या सर्वे नं. १४१, हिस्सा नं. ६ या खैराटवाडी येथील काजू बागेत चिरेबंदी…

Read Full News

प्रज्वलनशील इंधनाचा टँकर गटारात कलंडला…

⚡कणकवली ता.२९-: खिंडीपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर, सिंधुदुर्गाच्या हद्दीत पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारा टँकर अचानक रस्त्यालगत बांधलेल्या गटारात कलंडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायतीचा पाण्याचा टँकर, जेसीबी व इतर आग प्रतिबंधक यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. सर्व आवश्यक उपाययोजना केल्यानंतर, तसेच आग लागण्याचा संभव…

Read Full News

बांदा चेकपोस्टवर दारू वाहतुकीवर कारवाई…

११.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त: एक जण ताब्यात.. ⚡बांदा ता.२९-: : बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूबंदी कायद्याअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली असून, चेकपोस्टवर वाहनासह मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी एका संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास बांदा चेकपोस्ट…

Read Full News

वेंगुर्ला भाजपा पदाधिकारी यांनी घेतली जिल्हा परिषद अध्यक्ष भेट…

योगेश शेट्ये यांच्या उपस्थितीने चर्चाना उधाण.. ⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला तालुक्यातील भाजपच्या काही सरपंच व पदाधिकारी यांनी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांची भेट घेतली. यावेळी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पप्पू परब, पेंडुर सरपंच संतोष गावडे, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर यांच्यासह ठाकरे…

Read Full News

धरण भरले तरी सावंतवाडीत पाणी टंचाई का…?

राजू कासकर यांचा सवाल: सत्ताधारी व विरोधक गंभीर प्रश्नाकडे लक्ष न देता फक्त पाहणी करून फोटोसेशन करून प्रसिद्धी मिळवण्यास आहेत व्यस्त… ⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारे धरण योग्य प्रमाणात भरलेले असतानाही शहरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा का लागत आहे..? असा सवाल मनसेचे शहराध्यक्ष राजू कासकर यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान शहरात गॅस पाइपलाईन व…

Read Full News

डिंगणे-बांबरवाडीत गव्यांचा हैदोस…

बागायतीचे मोठे नुकसान: शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.. ⚡बांदा ता.२९-: डिंगणे-बांबरवाडी परिसरात गव्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील शेतकरी सुनील धामापूरकर यांच्या माड व फोफळी बागायतीवर गव्यांच्या कळपाने हल्ला करून मोठे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास गव्यांचा कळप शेतात शिरला व त्यांनी माड व फोफळीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात मोडतोड…

Read Full News

डिंगणे-बांबरवाडीत गव्यांचा हैदोस…

बागायतीचे मोठे नुकसान: शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.. ⚡बांदा ता.२९-: डिंगणे-बांबरवाडी परिसरात गव्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील शेतकरी सुनील धामापूरकर यांच्या माड व फोफळी बागायतीवर गव्यांच्या कळपाने हल्ला करून मोठे नुकसान केल्याची घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास गव्यांचा कळप शेतात शिरला व त्यांनी माड व फोफळीच्या झाडांची मोठ्या प्रमाणात मोडतोड…

Read Full News

मालवणात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न…

⚡मालवण ता.२९-:सिंधुदुर्ग जिल्हा अन्नसुरक्षा प्राधिकरण व सुवर्ण महोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या वतीने मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात अन्नसुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी उपस्थित प्रशिक्षक अंकुश जोगदंडे आणि इतर अधिकाऱ्यांनी अन्नसुरक्षा कायद्याबाबत जाणीव जागृती आणि खाद्यपदार्थ उत्पादन व निर्मितीमध्ये पाळावयाचे नियम, घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन करत शंकांचे निरसन केले. या कार्यशाळेस मालवण तालुक्यासह…

Read Full News

चक्रवर्ती सम्राट अशोक यांना भारतीय बौद्ध महासभा मालवणतर्फे अभिवादन…

⚡मालवण ता.२८-:भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, कट्टा येथे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३३० व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष रविकांत कदम, जिल्हा संस्कार सचिव विलास वळंजू, तालुका कोषाध्यक्ष सूर्यकांत कदम आणि तालुका संस्कार सचिव योगेश वराडकर आदी उपस्थित होते.

Read Full News

You cannot copy content of this page