प्रज्वलनशील इंधनाचा टँकर गटारात कलंडला…

⚡कणकवली ता.२९-: खिंडीपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर, सिंधुदुर्गाच्या हद्दीत पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारा टँकर अचानक रस्त्यालगत बांधलेल्या गटारात कलंडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायतीचा पाण्याचा टँकर, जेसीबी व इतर आग प्रतिबंधक यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती.

सर्व आवश्यक उपाययोजना केल्यानंतर, तसेच आग लागण्याचा संभव लक्षात घेऊन काळजीपूर्वक टँकर गटारातून बाहेर काढण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

You cannot copy content of this page