वेंगुर्ला भाजपा पदाधिकारी यांनी घेतली जिल्हा परिषद अध्यक्ष भेट…

योगेश शेट्ये यांच्या उपस्थितीने चर्चाना उधाण..

⚡वेंगुर्ला ता.२९-: वेंगुर्ला तालुक्यातील भाजपच्या काही सरपंच व पदाधिकारी यांनी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांची भेट घेतली. यावेळी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे, भाजपा वेंगुर्ला तालुकाध्यक्ष पप्पू परब, पेंडुर सरपंच संतोष गावडे, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे केळूस सरपंच योगेश शेट्ये हेही उपस्थित होते.दरम्यान योगेश शेट्ये यांच्या उपस्थितीने चर्चाना उधाण आले होते. संपूर्ण वेंगुर्ला तालुक्यात याबाबत चर्चा सुरु आहे .

You cannot copy content of this page