Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सर्वच तालुक्यात पावसाचे शतक

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१५-:* जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचे शतक झाले असून गेल्या चोवीस तासात सरासरी 156.72 मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात 198 मि.मी. नोंद झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1853.03 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून…

Read Full News

कळसुलकर हायस्कूलमधील निवडक गरजू विद्यार्थिनींना सायकलचे वितरण

*ऑस्ट्रेलिया येथील गिरीश मरकाळे यांनी दिलेल्या देणगीतून वाटप *💫सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी मधील तीन विद्यार्थिनींना श्री गिरीश बी मरकाळे (ऑस्ट्रेलिया)* यांनी दिलेल्या देणगीतून सायकल प्रदान करण्यात आल्या. प्रशालेचे माजी विद्यार्थी श्री विष्णू शिरोडकर यांच्या माध्यमातून ऑस्ट्रेलिया स्थित श्री गिरीश बी मरकाळे यांनी…

Read Full News

वैभववाडीत उद्या शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान

तालुका प्रमुख मंगेश लोके यांची माहिती वैभववाडी प्रतिनिधी शिवसेना पक्षाच्या शिवसंपर्क अभियानाला उद्या दि. १५ जुलै रोजी. साय. ५ वा. वैभववाडीत शुभारंभ होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कोकीसरे माधवराव पवार विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार…

Read Full News

*जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर मायकल डिसोजा यांची बिनविरोध निवड*

*💫सावंतवाडी ता.१४-:* जिल्हा परिषद स्थायी समितीवर जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.आज झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये ही निवड करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष मायकल डिसोजा हे समाजकारण करत असून, त्यानी आपल्या जिल्हा परिषद मतदार संघात मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून विकास केला आहे. या कामाची दखल घेऊन खासदार विनायक…

Read Full News

देवगड येथे कॉग्रेसची आढावा बैठक संपन्न

जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या उपस्थितीत पार पडली बैठक *💫देवगड दि.१४-:* सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत देवगड तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक आज १४ जुलै रोजी सकाळी देवगड येथे पार पडली. तालुक्यातील बुथ कमिट्या करण्याचे काम चालू असून लवकरच बूथ कमिट्याची यादी जिल्हा काँग्रेसला पाठविण्यात येईल, असे तालुका अध्यक्ष…

Read Full News

*ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपचे दक्षिण मुंबईत आंदोलन

मुंबई दि प्रतिनिधी “ओबीसीला आरक्षण मिळालेच पाहिजे…. देवेंद्र फडणवीस आप आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजप दक्षिण मुंबईच्या वतीने आंदोलन मुंबईत आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण मिळून न्याय मिळालाच पाहिजे, हे आंदोलन मुंबईच्या सर्व भागात पसरविणार असा इशारा यावेळी भाजप नेत्यांकडून देण्यात…

Read Full News

नाटळ केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख निलंबित

प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची माहिती सिंधुदुर्गनगरी ता १४ नाटळ केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी ठरवत निलंबित करण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी आज दिली. कणकवली तालुक्यातील नाटळ केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख भागोजी अडूळकर यांनी सन २०१९- २०२० या कालावधीत लेखापरीक्षण अहवाल वेळेत सादर केलेला नाही. याबाबत त्यांना वारंवार संधी…

Read Full News

कोलगाव भोमवाडी येथे दुसऱ्या आरोग्य केंद्राला मंजूरी

कोलगाववासियांतर्फे पालकमंत्री यांचे जि.प सदस्य मायकल डिसोजा यांनी मानले आभार *💫सावंतवाडी दि.१४-:* येथील कोलगाव गावातील भोमवाडी येथे दुसऱ्या आरोग्य केंद्राला पालकमंत्र्यांनी मंजूर दिली. यासाठी रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष श्री मायकल डिसोजा यांनी वारंवार पाठपुरवठा केला होता. उपकेंद्र मंजूर झाल्याबद्दल कोलगाव वासियांतर्फे पालकमंत्री यांचे आभार मानण्यात आले आहेत. कोलगावचे शहरीकरण होत असल्याने कोलगावची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात…

Read Full News

सफाई कामगारांना वारसा हक्काने दिलेल्या चुकीच्या नियुक्त्या रद्द करा

मनसेचे जि. प. प्रवेशद्वारासमोर उपोषण आंदोलन सिंधुदुर्गनगरी ता १४ सफाई कामगारांना वारसा हक्काने दिलेल्या चुकीच्या नियुक्त्या रद्द करून भूमिपुत्रांना न्याय द्यावा. या मागणीसाठी मनसेने आज जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर उपोषण आंदोलन छेडले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असल्याने मनसेचे आज चे आंदोलन लक्षवेधी ठरले. मुसळधार पावसात देखील आंदोलनकर्ते ठाण मांडून बसले होते.”आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय”…

Read Full News

अतिवृष्टीमुळे मालवण तालुक्यातील नद्यांना पूर

रस्तेही पाण्याखाली;१५७ मिमी पावसाची नोंद *💫मालवण दि.१४-:* वरूनराजाने आज बुधवारीही मालवण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने तालुका जलमय झाला आहे. मुसळधार पावसामुळे मालवण शहरातील रस्तेही पाण्याखाली गेले होते. आज सकाळ पर्यंत मालवण तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक अशा १५७ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली….

Read Full News

You cannot copy content of this page