मुंबई दि प्रतिनिधी “ओबीसीला आरक्षण मिळालेच पाहिजे…. देवेंद्र फडणवीस आप आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजप दक्षिण मुंबईच्या वतीने आंदोलन मुंबईत आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण मिळून न्याय मिळालाच पाहिजे, हे आंदोलन मुंबईच्या सर्व भागात पसरविणार असा इशारा यावेळी भाजप नेत्यांकडून देण्यात आला. भंडारी समाजाचे प्रेरणास्थान असलेल्या श्री भागोजीशेट कीर यांच्या स्मृतीस्थळाजवळ जे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजप मुंबई अध्यक्ष मंगलंप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाड, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार कॅप्टन सेल्सम, ओबीसी मोर्चा मुंबई अध्यक्ष नरेंद्र गावकर, ओबीसी मोर्चा मुंबई महामंत्री गुरूनाथ मिठबावकर, दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेश शिरवाडकर, भंडारी समाज महासंघ नेते तुषार कांबळी, संजय पाटील यांसह अनेक भाजप कार्यकर्ते व ओबीसी समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्य सरकारकडून ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लढा पुकारला आहे. या लढ्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहणार आहे. ओबीसी समाजाचे महत्व मोठे असून या समाजबद्दल भाजपला काळजी आहे. स्वातंत्र्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वात जास्त ओबीसी मंत्री आताच्या मोदी सरकारमध्ये आहेत आणि पंतप्रधान मोदी हे देखील ओबीसी समाजाचे पाहिले पंतप्रधान आहेत. ओबीसी समाजाचे महत्व लक्षात घेता या समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी मागणी यावेळी भाजप व ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून करण्यात आली.
*ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपचे दक्षिण मुंबईत आंदोलन
