नाटळ केंद्रशाळेचे केंद्रप्रमुख निलंबित

प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी ता १४ नाटळ केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी ठरवत निलंबित करण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी आज दिली. कणकवली तालुक्यातील नाटळ केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख भागोजी अडूळकर यांनी सन २०१९- २०२० या कालावधीत लेखापरीक्षण अहवाल वेळेत सादर केलेला नाही. याबाबत त्यांना वारंवार संधी देऊनही सादिल निधी खर्च, ऑफिस खर्चाबाबत ची माहिती दिलेली नाही. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी संबंधित नाटक केंद्र शाळेला व या केंद्र अंतर्गत येणाऱ्या शाळांना भेटी दिल्या असता केंद्रप्रमुख भागोजी आडुळकर यांनी दैनिक उपस्थिती बाबतचे रेकॉर्ड ठेवलेले नाही. असे दिसून आले. तसेच केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांना प्रशासनाकडून देण्यात येणारी माहिती पुरवली नाही .कोविड बाबत केंद्रांचा आढावा प्रशासनात सादर केलेला नाही .त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली असल्याचा ठपका ठेवत केंद्र प्रमुख भागोजी अडुळकर यांना सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी आज दिली.

You cannot copy content of this page