कोलगाव भोमवाडी येथे दुसऱ्या आरोग्य केंद्राला मंजूरी

कोलगाववासियांतर्फे पालकमंत्री यांचे जि.प सदस्य मायकल डिसोजा यांनी मानले आभार

*💫सावंतवाडी दि.१४-:* येथील कोलगाव गावातील भोमवाडी येथे दुसऱ्या आरोग्य केंद्राला पालकमंत्र्यांनी मंजूर दिली. यासाठी रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष श्री मायकल डिसोजा यांनी वारंवार पाठपुरवठा केला होता. उपकेंद्र मंजूर झाल्याबद्दल कोलगाव वासियांतर्फे पालकमंत्री यांचे आभार मानण्यात आले आहेत. कोलगावचे शहरीकरण होत असल्याने कोलगावची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे कोलगावातील एकच उपकेंद्र अपुरे पडत होते. यामुळे दुसरे आरोग्य केंद्र भोमवाडी येथे व्हावे यासाठी गेले कित्येक वर्ष आरोग्य उपकेंद्र जिल्हा परिषद सदस्य तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष मायकल डिसोजा सतत पाठपुरवठा करत होते. अखेर आज कोलगाव भोमवाडी येथे आरोग्य उपकेंद्र पालकमंत्र्यांनी मंजूर केले आहे. त्यामुळे डिसोजा यांच्या प्रयत्नाना यश आले आहे. उपकेंद्र मंजूर झाल्याबद्दल कोलगाव वासियांतर्फे पालकमंत्री यांचे आभार मानण्यात आले.

You cannot copy content of this page