वैभववाडीत उद्या शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान

तालुका प्रमुख मंगेश लोके यांची माहिती

वैभववाडी प्रतिनिधी शिवसेना पक्षाच्या शिवसंपर्क अभियानाला उद्या दि. १५ जुलै रोजी. साय. ५ वा. वैभववाडीत शुभारंभ होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कोकीसरे माधवराव पवार विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी दिली. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात गावोगावी शिवसंपर्क आभियान सुरू करण्यात आल आहे. राज्यभर दि. १२ जुलै ते २४ जुलै पर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे. वैभववाडी तालुक्यात गुरुवारी १५ जुलैला या अभियानाचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित शुभारंभ होणार आहे. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शहर प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथप्रमुख, महिला आघाडी, युवासेना अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, ग्रा. पं. सदस्य, शिवसैनिक व सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी उपस्थितीत राहावे अस आवाहन तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी केले आहे.

You cannot copy content of this page