अतिवृष्टीमुळे मालवण तालुक्यातील नद्यांना पूर

रस्तेही पाण्याखाली;१५७ मिमी पावसाची नोंद

*💫मालवण दि.१४-:* वरूनराजाने आज बुधवारीही मालवण तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नद्यांना पूर आला असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने तालुका जलमय झाला आहे. मुसळधार पावसामुळे मालवण शहरातील रस्तेही पाण्याखाली गेले होते. आज सकाळ पर्यंत मालवण तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक अशा १५७ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली. अतिवृष्टीमुळे मालवण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडनदीसह इतर नद्या नाल्याना पूर आला आहे. मालवण शहरातील रस्ते जलमय झाले होते. तर शहरातील दांडी, आडवन, वायरी भागात पाणी भरले होते. तर पावसा बरोबर अधून मधून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्याच्या तडाख्यात काही ठिकाणी झाडे कोसळली तर काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले. आज बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मालवणात १५७ मिमी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मालवणात कोसळला आहे. तर आतापर्यंत मालवणात १९२० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

You cannot copy content of this page