Global Maharashtra Breaking News

*मानधनातील अनिश्चिततेमुळे क्षयरोग आणि कुष्ठरोग सर्वेक्षणास कुडाळ तालुक्यातील आशा वर्कसचा नकार*

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आशा वर्कर्स व आशा गट प्रवर्तक कोरोना काळात घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या आरोग्याची माहिती संकलित करत आहेत. हे काम सुरू असतानाच शासनाने आता क्षयरोग व कुष्ठरोग सर्व्हेही आशांनी करावा असे आदेश काढले आहेत. मात्र या सर्व्हेच्या मानधनात अनिश्चितता असल्याने हा सर्व्हे करण्यास कुडाळ तालुक्यातील आशा कर्मचाऱ्यांनी नकार दिला…

Read More

जिल्ह्यात एकूण ४ हजार ९२४ जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या २२९ वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.०१-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ९२४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

Read More

सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्या समोर छेडण्यात येणारे आंदोलन आश्वासनाअंती तात्पुरते स्थगित

सामाजिक कार्यकर्ते हेमंत मराठे यांनी पुकारले होते एक्स रे आंदोलन *💫सावंतवाडी दि.०-:* सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांच्या समोर छेडण्यात येणारे उपोषण आश्‍वासनअंती हेमंत मराठे यांनी तात्पुरते स्थगित केले आहे कोलगावं बूर्डी पुल ते सावंतवाडी मळेवाड आरोंदा रेडी रस्ताचे डांबरीकरण काम मंजूर असून गेले कित्येक दिवस काम सुरू करण्यात आले नव्हते तसेच या मार्गावर मोठ्या प्रमाणात…

Read More

श्री देव रामेश्वर संस्थानच्या कार्तिकोत्सवाची त्रिपुरारी पौर्णिमेला पालखी सोहळ्याने सांगता

*💫मालवण दि.०१-:* इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या गेला महिनाभर कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या कार्तिकोत्सवाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेच्या रात्री पालखी सोहळ्याने तर दुसरया दिवशी पहाटे काकड आरतीची सांगता दहिहंडी फोडून झाली.त्रिपुरारी पौर्णिमेला रात्रौ मंदिर परिसर दिपोत्सवाने उजळून निघाला होता. या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्र्वभूमीवर हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा केला गेला. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानचा…

Read More

सदस्य नोंदणीत कुडाळ मालवण पॅटर्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक नंबरला राहील – संग्राम प्रभुगावकर

*माणगाव,घावनळे,पावशी, पिंगुळी जि.प. मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ;आ.वैभव नाईक, संजय पडते, संग्राम प्रभुगावकर यांनी केले मार्गदर्शन *💫मालवण दि.०१-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ ते १५ डिसेंबर या कालावधीत शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे.यांचा शुभारंभ मागणाव येथून झाल्यानंतर घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघात गोठोस येथे कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर पावशी व पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना…

Read More

शहरातील दुर्लक्षित भगवे ध्वज, पुन्हा लागले डौलाने फडकू

*युवा रक्तदाता संघटनेच्या पुढाकाराने शहरातील विविध चौकातील भगवे ध्वज आले बदलण्यात *💫सावंतवाडी दि.०१-:* छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कायम ज्वलंत ठेवणारे आणि हिंदुत्वाचे प्रतिक असणारे भगवे ध्वज एकेकाळी शहरातील विविध चौकाचौकात उभारण्यात आले होते. परंतु गेली अनेक वर्षे शहरातील विविध चौकात डौलाने फडकणाऱ्या भगव्या ध्वजाकडे दुर्लक्ष झाले होते. ही बाब युवा रक्तदाता संघटनेच्या निदर्शनास येताच संघटनेच्या…

Read More

मालवण ते कसाल आणि मालवण ते कुडाळ रस्त्यावर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारावीत

युवक कॉंग्रेस कुडाळ मालवण मतदारसंघाच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी यांची पालकमंत्र्यांकडे मागणी *💫मालवण दि.०१-:* मालवण ते कसाल ते मालवण आणि मालवण ते कुडाळ या दोन्ही महत्वाच्या रस्त्यांवर सार्वजनिक स्वच्छता गृहे उभारण्यात यावीत अशी मागणी युवक कॉग्रेसच्या कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालवण मध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दररोज येतात….

Read More

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनूर्ली माऊली देवीचा जत्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा

देवस्थान कमिटीच्या आवाहनाला भक्तांचा प्रतिसाद *💫सावंतवाडी दि.०१-:* कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोनुर्ली माऊली देवीचा या वर्षीचा जत्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असून, देवस्थान कमिटीच्या आव्हानाला भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेला श्री देवी माऊलीच्या जत्रोत्सवावर शुकशुकाट पसरला आहे. यावेळी देवी माऊलीच्या मंदिरात संपूर्ण फुलांची आरास करण्यात आली आहे. दर्शनासाठी मात्र स्थानिक लोकांना कडून…

Read More

आंबोली बसस्थानकाचे आणि शौचालयाचे काम बोगस

*आंबोलीतील नागरिकांचा भ्रष्टाचार झाल्याचा ठेकेदारावर आरोप* *💫आंबोली दि.०१-:* सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील एसटी बस स्थानकात शौचायल बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे.परंतु हा शौचालय बस स्थानकाला जोडून बांधण्याचे काम ठेकेदार करत असून, आंबोली बसस्थानकाचे बांधकाम बोगसरित्या करण्यात आले असून, पावसाळ्यात बस स्थानकात सर्वत्र गळती सुरू असते असा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या कामासाठी २४ लाख रुपये…

Read More

सांगवे येथील भात खरेदी केंद्राचा आमदार नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

*💫कणकवली दि.०१-:* तालुक्यातील सांगवे गावातील सांगवे सोसायटीतर्फे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ श्रीफळ वाढवून आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी भाजप प्रांतिक सदस्य श्री.सुरेश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजप जिल्हा सरचिटणीस श्री.गोट्या सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विदयमान जिल्हा परिषद सदस्या सौ संजना सावंत, कणकवली पंचायत समिती उपसभापती सौ.दिव्या पेडणेकर, पं स…

Read More
You cannot copy content of this page