*युवा रक्तदाता संघटनेच्या पुढाकाराने शहरातील विविध चौकातील भगवे ध्वज आले बदलण्यात
*💫सावंतवाडी दि.०१-:* छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कायम ज्वलंत ठेवणारे आणि हिंदुत्वाचे प्रतिक असणारे भगवे ध्वज एकेकाळी शहरातील विविध चौकाचौकात उभारण्यात आले होते. परंतु गेली अनेक वर्षे शहरातील विविध चौकात डौलाने फडकणाऱ्या भगव्या ध्वजाकडे दुर्लक्ष झाले होते. ही बाब युवा रक्तदाता संघटनेच्या निदर्शनास येताच संघटनेच्या माध्यमातून हे भगवे ध्वज बदलण्यात आले आहेत. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, जोसेफ आल्मेडा, मेहर पडते, आर्चित पोकळे, प्रथमेश प्रभु, प्रतिक बांदेकर, मॅलवीन डिसोझा, शब्बीर मणियार, नितिन कारेकर, शुभम बिद्रे, हृषिकेश सुर्याजी आदी उपस्थित होते.