मालवण ते कसाल आणि मालवण ते कुडाळ रस्त्यावर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारावीत

युवक कॉंग्रेस कुडाळ मालवण मतदारसंघाच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

*💫मालवण दि.०१-:* मालवण ते कसाल ते मालवण आणि मालवण ते कुडाळ या दोन्ही महत्वाच्या रस्त्यांवर सार्वजनिक स्वच्छता गृहे उभारण्यात यावीत अशी मागणी युवक कॉग्रेसच्या कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालवण मध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दररोज येतात. येणारे पर्यटक हे कसाल – मालवण व कुडाळ – मालवण या दोन मुख्य मार्गांवरून मालवणात दाखल होत असतात. यामुळे या दोन्ही मार्गांवर रहदारी जास्त असल्याने लांबचा पल्ला गाठून आलेल्या प्रवाशांना या मार्गावर स्वच्छता गृहांची कमतरता जाणवते. या मार्गांवर आवश्यक स्वच्छता गृहे उपलब्ध नसल्या मुळे पर्यटक तसेच प्रवासी नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणावरती गैरसोय होते. यामध्ये महिला, पर्यटक, तसेच अपंग विकलांग, यांना स्वच्छतागृहा अभावी त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या दोन्ही मार्गांवर काही मोक्याच्या ठिकाणी स्वच्छता गृहे उभारण्यात यावी, अशी मागणी पल्लवी तारी यांनी आपल्या निवेदनातून केली आहे. याबाबतचे निवेदन तारी यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना मालवण येथे सादर केले. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे जिल्हा सचिव बाळू अंधारी उपस्थित होते. फोटो- कुडाळ- मालवण आणि कसाल मालवण या रस्त्यांवर स्वच्छता गृहे उभारण्याच्या मागणीचे निवेदन पालकमंत्री उदय सामंत यांना सादर करताना युवक काँग्रेसच्या कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या उपाध्यक्षा पल्लवी तारी, सोबत काँग्रेसचे जिल्हा सचिव बाळू अंधारी.

You cannot copy content of this page