*आंबोलीतील नागरिकांचा भ्रष्टाचार झाल्याचा ठेकेदारावर आरोप*
*💫आंबोली दि.०१-:* सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील एसटी बस स्थानकात शौचायल बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे.परंतु हा शौचालय बस स्थानकाला जोडून बांधण्याचे काम ठेकेदार करत असून, आंबोली बसस्थानकाचे बांधकाम बोगसरित्या करण्यात आले असून, पावसाळ्यात बस स्थानकात सर्वत्र गळती सुरू असते असा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या कामासाठी २४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. परंतु हे काम फक्त १२ लाखात करून भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच ज्यावेळी हे बांधकाम झाले त्यावेळी शौचालय बांधण्यात आले नसून, आता बांधण्यात आलेल्या शौचाल्यासाठी किती लाखाचा निधी मंजूर झाला आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच आंबोलीत पे शौचालय बांधकाम करण्याची घोषणा पर्यटन निधीतून होणार होती त्याचे काय झाले असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. आंबोली येथे सिंगल शौचालयचे बांधकाम करून जनतेची आणि प्रवाशांची दिशाभूल करत आहेत. ठेकेदार बोगस काम करण्याच्या मागे असल्याने कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता ठेकेदार मुतारीचे काम करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.