Headlines

Global Maharashtra Breaking News

पत्रकार प्रसन्न गोंदावळे यांना सिंधुदुर्ग पोलिस अधिक्षकानी दिल्या शुभेच्छा…

*💫सावंतवाडी दि.२६-:* कोकण विभाग पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ग्लोबल महाराष्ट्र चॅनलचे पत्रकार प्रसन्न गोंदावळे यांना जाहीर झाल्यानंतर पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर, हिदायतुल्ला खान, महिला शहराध्यक्ष चित्रा देसाई यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Full News

बांदा शहरात बसवीणार तीन सायरन

पुरस्थितीची माहिती मिळण्यासाठी पोलिस अधीक्षक दाभाडे यांचे आदेश; *💫सावंतवाडी ता.२६-:* बांदा शहरासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून एका बोटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बांदा येथील व्यापाऱ्यांनी केली. यावेळी या साहित्यासाठी जो फंड लागेल तो आपण मिळून देऊ, असे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी उपस्थित व्यापारी व अधीक्षक यांना सांगितले. तसेच बांदा येथे तीन सायरन बसवण्याचे आदेश…

Read Full News

गांजा प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शोध घेणार

दारू वाहतुकीवर लगाम लावण्यासाठी बांदा लाठीवर मॅन पॉवर वाढवणार – पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे *💫सावंतवाडी ता.२६ प्रसन्न गोदावळे -:* गांजा प्रकरणाच्या मुळाशी जाऊन त्यांच्या शोध घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. आज गांजा प्रकरणात आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी…

Read Full News

गोव्यात नोकरीसाठी ये-जा करणाऱ्या तरुणांबाबत महाराष्ट्र व गोवा सरकारने येत्या ४ दिवसात तोडगा काढावा

अन्यथा सिंधुदुर्गातून गोव्यात जाणाऱ्या अत्यावश्यक सेवा रोखण्यात येतील;बांदा सरपंच अक्रम खान यांचा इशारा *💫बांदा दि .२६-:* गाळेल येथे दरड कोसळून तरुणाचा बळी गेल्याने याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे. गोव्यात नोकरीसाठी दररोज ये-जा करणाऱ्या तरुणांबाबत महाराष्ट्र व गोवा सरकारने येत्या ४ दिवसात समन्वय करून योग्य तोडगा काढावा अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात जाणाऱ्या सर्व अत्यावश्यक सेवा रोखण्यात…

Read Full News

बांबरवाडी येथे कारचा अपघात

*💫बांदा दि.२६-:* बांदा-डिंगणे रस्त्यावर बांबरवाडी येथे भरधाव वेगात मोटार रस्त्याच्या कडेला उलटून अपघातग्रस्त झाली. अरुंद रस्त्यामुळे याठिकाणी अपघातांची संख्या वाढत असल्याने या रस्त्यावरील बेकायदा वाहतूक बंद करावी अशी लेखी मागणी डिंगणे ग्रामपंचायतीने सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. गोवा-महाराष्ट्र सीमेवर कोरोना निगेटिव्ह अहवाल मागत असल्याने गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ये-जा करणारे अनेक वाहनचालक डिंगणे मार्गे बांदा या…

Read Full News

इन्सुली नूतन माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहाचे 28 रोजी भूमिपूजन

*💫बांदा दि.२६-:* विद्या विकास मंडळ इन्सुली संचालित नूतन माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहाचे भूमिपूजन बुधवार दिनांक २८ रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. तरी सभागृहाच्या भूमिपूजन कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे सचिव विकास केरकर यांनी केले आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजन तेली, इन्सुली सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर,…

Read Full News

वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या चार कर्मचाऱ्यांना बढती

*💫वेंगुर्ले दि.२६-:* वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये काम करणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी बढती दिली असून त्यांच्या उत्कृष्ठ कामाची पोच त्यांना दिली असल्याची माहिती वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी दिली. वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये पोलीस हवालदारपदावर काम करणारे सचिन सावंत यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून तर पोलीस काँन्स्टेबल या पदावर काम करणारे…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या ई-लिलाव प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी *💫वेंगुर्ले दि.२६-:* वेंगुर्ला नगरपरिषद मालकीच्या दुकान गाळ्यांच्या ई-लिलाव प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी वेंगुर्ला नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याजवळ निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी वेंगुर्ला मनसे तालुकाध्यक्ष सनी बागकर, रुपेश कुडतरकर, नागेश गावडे, प्रथमेश नाईक, तुषार भाटकर, केतन सुकी, किरण राटे, तेजस किनळेकर,…

Read Full News

सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १९ रुग्ण सापडले

*💫सावंतवाडी दि.२६ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ६ तर ग्रामीण भागात १३ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

Read Full News

आपत्कालीन उपाययोजनासाठी जिल्हा नियोजनमधून निधी

पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती *💫ओरोस ता.२६-:* तिलारीचा प्रश्न राज्यस्तरीय असल्याने १५ दिवसांत मंत्री स्तरावर बैठक घेतली जाईल. येथील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी अद्यावत वायरलेस यंत्रणा उभारली जाणार आहे. मल्हारपुर पर्यायी व्यवस्थेसाठी २५ लाख खारेपाटण मधील छोटी पुल दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये, अतिवृष्टीने जिल्ह्यात निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पतन विभागाच्या माध्यमातून ५ कोटी रुपये अशाप्रकारे…

Read Full News

You cannot copy content of this page