मार्च एंडिंगमुळे प्रशासन आक्रमक; सावंतवाडी नगरपरिषदेकडून दोन मालमत्ता सील
*💫सावंतवाडी दि.३० विनय वाडकर -:* मार्च एंडिंग च्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी नगरपालिकेकडून घरपट्टी न भरलेल्या नागरिकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. नगरपालिकेकडून शहरात जोरदार कारवाई सुरू असून, आज उभा बाजार येथे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दोन मालमत्ता धारकांवर कारवाई करत त्यांची प्रोपर्टी सील करण्यात आली आहे. याबाबतची माहिती नगरपालिका कार्यालयीन प्रमुख आसावरी शिरोडकर यांनी दिली आहे.
