मंत्री, प्रशासनावर ताबा नसल्याने राज्यात पुन्हा लॉकडाऊनची नामुश्कि

भाजपचा लॉकडाऊनला विरोध; प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांची ठाकरे सरकारवर टिका

कणकवली-: ठाकरे सरकारचे लॉकडाऊन संपल्यानंतर आजपर्यंतचे फसलेले नियोजन, सरकार चालविण्यात आलेले अपयश, मंत्र्यांवर नसलेला ताबा यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन सुरू करण्याचा विचार करत आहे. मंत्री तुपाशी राहतात आणि गरीबाला मात्र रस्त्यावर येऊन काम केल्याशिवाय त्याची चूल पेटत नाही. राज्यात लॉकडाऊन ला भाजपाचा विरोध असल्याचे भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कोव्हीड लसीकरण वाढवा, आरोग्य यंत्रणा अधिक सुधारा, पोलीस यंत्रणेचे पगार वेळेत द्या. कोव्हीड लस उपलब्ध असूनही लसीकरण होत नाहीय. त्याचे काहीही नियोजन झालेले नाही. मंत्री तुपाशी राहतात पण गरीब जनतेला रस्त्यावर येऊन काम केल्याशिवाय त्यांच्या पोटाची खळगी भरणार नाही. लॉकडाऊनमुळे आम जनतेचे हाल होतील. नाईट लाईफ बंद करा. मस्तवाल पिसाळलेल्या मंत्र्यांना आवरा. ठाकरे सरकारमध्ये आत्महत्यांचे सत्र संपत नाहीय, सुशांत सिंह, दिशा सालीयन, फॉरेस्ट ऑफिसर दीपाली चव्हाण आदींनी आत्महत्या केली. मनसुख हिरेन प्रकरण अजून गाजतेय. आत्महत्याग्रस्त ठाकरे सरकारमुळे महाविकास आघाडी सरकारवर आत्महत्येची वेळ आलेली असल्याची टीका जठार यांनी केली. संपूर्ण लॉकडाऊन हा पर्याय नसून अत्यावश्यक प्रतिबंध अंमलात आणावेत. विरोधी पक्ष म्हणून भाजपा सरकारला सहकार्य करेल. संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्याआधी गरीब जनतेच्या खात्यात दरमहा 10 हजार रुपये द्यावेत अन्यथा भाजपा याविरोधात आंदोलन करेल असा इशाराही जठार यांनी दिला.

You cannot copy content of this page