हा सांस्कृतिक वारसा पुढील शंभर वर्षे चालू राहो”…

संजू परब: स्व. प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नाट्य महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन..

⚡सावंतवाडी ता.०५-: स्वर्गीय प्रकाश फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला नाट्यमहोत्सव कार्यक्रम स्तुत्य असून हा सांस्कृतिक उपक्रम पुढील शंभर वर्षे अखंड सुरू राहावा, असे मत शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केले. ते तळवडे येथे आयोजित नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.यावेळी संजू परब यांच्या हस्ते नाट्यमहोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना परब म्हणाले, “सुरज परब यांचे विशेष कौतुक करावे लागेल. त्यांनी वडिलांचा सांस्कृतिक वारसा जपून तो पुढे नेण्याचे काम हाती घेतले आहे, ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या हातून असेच चांगले कार्य घडत राहो, हीच सदिच्छा.”तसेच स्वर्गीय प्रकाश परब यांच्याशी असलेल्या आपल्या जवळच्या संबंधांची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, त्यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लावण्यात आली होती. पुढील काळात सुरज परब यांनीही त्याच पद्धतीने लोकांच्या समस्या सोडवून न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, कला रसिक व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

You cannot copy content of this page