Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी ११० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४५ हजार ४०६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार २५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ११० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

रोटरी क्लब च्या वतीने कल्पवृक्षाची लागवड

भंडारी ए. सो.हायस्कूल च्या परिसरात केली लागवड मालवण दि प्रतिनिधी -:पर्यावरण विषयक जाणीव जपताना वृक्षारोपण व संवर्धन विषयक जनजागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने रोटरी क्लब, मालवणच्या वतीने मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या परिसरात तसेच मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंड येथे माडाच्या झाडाचे (कल्पवृक्षाचे) रोपण रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष उमेश सांगोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी…

Read Full News

सावंतवाडी खासकीलवाडा येथे परप्रांतीय वृध्दाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

*सावंतवाडी-:* एका परप्रांतीय वृध्दाचा मृतदेह सावंतवाडी खासकीलवाडा परिसरात संशयास्पदरीत्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार आज दुपारच्या सुमारास उघडकीस आला.

Read Full News

फडणवीस सरकारप्रमाणे पूरग्रस्तांना भरघोस मदत करा

भाजपाचे आमदार नितेश राणे यांची आघाडी सरकारकडे मागणी *⚡कणकवली दि.०५-:* देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१९ मध्ये पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्तांसाठी जशी भरघोस मदत केली होती तशीच मदत आघाडी सरकारने द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. आम.नितेश राणे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की , अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी आघाडी सरकारने…

Read Full News

ओटवणे येथे महापुरामुळे घराचे नुकसान झालेल्यांना सिमेंट पत्रे वाटप

आम दीपक केसरकर यांचा पुढाकार;अशोक दळवी यांच्याहस्ते वाटप *⚡सावंतवाडी ता.०५-:* ओटवणे येथे महापुरामुळे घराचे नुकसान झालेल्यांना शिवसेनेच्या वतीने सिमेंट पत्र्याचे वाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका ओटवणे,विलवडे सरमळे वाफोली या गावांना बसला होता. या महापुरात शेतकऱ्यांच्या शेती व्यतिरिक्त घराचे मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. त्यात ओटवणे येथील विठोबा केरकर व भिवसेन गावकर…

Read Full News

पुनर्रचना केलेल्या तलाठी सजांमध्ये फेररचना करा

आम.वैभव नाईक यांनी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांचे लक्ष वेधले *⚡कणकवली ता.०५-:* कुडाळ व मालवण तालुक्यातील पुनर्रचना केलेल्या तलाठी सजांमध्ये काही गाव चुकीच्या तलाठी सजांना जोडले गेले आहेत.कामकाजाच्या दृष्टीने भविष्यात लोकांना याचा त्रास होणार आहे. या पुनर्रचनेबाबत महसूली गावांनी हरकती नोंदविल्या आहेत.त्यानुसार तलाठी सजांमध्ये फेररचना करण्याची मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे महसूल…

Read Full News

आशिये बायपासचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार

*⚡कणकवली ता.०५-:* कणकवली पटवर्धन चौकातून आचरा रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आशिये – कलमठ – वरवडे बायपाससाठी आवश्यक असणारी पोस्ट खात्याच्या मालकीची सर्व जमीन भूसंपादनाने ताब्यात घेण्यासाठी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी हालचाल सुरू केली आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेऊन रीतसर परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे येत्या महिन्याभरात सादर केला जाणार आहे. भूसंपादनासाठी…

Read Full News

सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी रूपेश आईर यांची नियुक्त

*⚡सावंतवाडी ता.०५-:* रूपेश आईर यांची सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत पत्रक सावंतवाडी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी आईर यांना यांना दिले आहे.

Read Full News

पत्रादेवी लाठी पुन्हा बंद करण्याचा निर्णय दुदैवी

कायद्याचा बडगा दाखवून कोणाची अडवणूक करू नका:जावेद खतिब *⚡बांदा.०५-:* येथिल पत्रादेवी लाठी प्रशासनाकडुन पुन्हा बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा दुदैवी आहे,कोरोनाचा प्रादुर्भात होवू नये यासाठी प्रशासनाने जनजागृती करावी कायद्याचा बडगा दाखवून कोणाची अडवणूक करू नये अशी मागणी भाजप युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बांद्याचे ग्रामपंचायत सदस्य जावेद खतिब यांनी केली आहे. पंचक्रोशीतील लोकांना होणारा…

Read Full News

बारावी परीक्षेतील यशाबद्दल अनुराग सावळचे अबिद नाईक यांनी केले अभिनंदन

*⚡कणकवली दि.०५-:* कणकवली तालुक्यातील आयडियल इंग्लिश ज्युनियर कॉलेज वरवडेचा सायन्स शाखेच्या अनुराग सावळ याने बारावी परीक्षेत 98.83%गुण मिळवून जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांक प्राप्त केला. अनुराग सावळ याच्या बारावीतील या यशाबद्दल राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन अनुराग सावळ याचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्याच्या आई वडिलांचे अभिनंदन केले.त्यावेळी राष्ट्रवादीचे सुभाष उर्फ़…

Read Full News

You cannot copy content of this page