*⚡कणकवली दि.०५-:* कणकवली तालुक्यातील आयडियल इंग्लिश ज्युनियर कॉलेज वरवडेचा सायन्स शाखेच्या अनुराग सावळ याने बारावी परीक्षेत 98.83%गुण मिळवून जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांक प्राप्त केला. अनुराग सावळ याच्या बारावीतील या यशाबद्दल राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन अनुराग सावळ याचे अभिनंदन केले. त्याचबरोबर त्याच्या आई वडिलांचे अभिनंदन केले.त्यावेळी राष्ट्रवादीचे सुभाष उर्फ़ बाबू सावंत, राष्ट्रवादीचे माजी ग्राहक संरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे, दयानंद उचले , गणेश चौगुले उपस्थित होते.
बारावी परीक्षेतील यशाबद्दल अनुराग सावळचे अबिद नाईक यांनी केले अभिनंदन
