कायद्याचा बडगा दाखवून कोणाची अडवणूक करू नका:जावेद खतिब
*⚡बांदा.०५-:* येथिल पत्रादेवी लाठी प्रशासनाकडुन पुन्हा बंद करण्याचा घेण्यात आलेला निर्णय हा दुदैवी आहे,कोरोनाचा प्रादुर्भात होवू नये यासाठी प्रशासनाने जनजागृती करावी कायद्याचा बडगा दाखवून कोणाची अडवणूक करू नये अशी मागणी भाजप युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बांद्याचे ग्रामपंचायत सदस्य जावेद खतिब यांनी केली आहे. पंचक्रोशीतील लोकांना होणारा त्रास लक्षात घेता जिल्हाधिकारी आणी प्रशासनाने योग्य तो तोडगा काढून सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा याबाबत आम्ही केद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेवून पुढील निर्णय घेवू असा इशारा त्यांनी दिला आहे बांदयाच्या सिमेवर असलेली पत्रादेवी लाठी काल सायंकाळी पासून पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे याबाबतचे निर्णय जिल्हाप्रशासनाकडुन देण्यात आले असे सांगून येथिल पोलिसांनी पुन्हा त्या ठीकाणी लाठी सुरू केली आहे मात्र सदयस्थिती परिस्थिती लक्षात घेता याचा फटका बांदा पंचक्रोशी सोबत संपुर्ण जिल्ह्याला सहन करावा लागत आहे एकीकडे कोरोनामुळे सगळ्याचे हाल सुरू आहेत अशा परिस्थिती जगायचे कसे असा प्रश्न सर्वासमोर आहे त्यामुळे अशा प्रकारे लाठी बंद करण्यात आल्यानंतर आर्थिक व्यवहार होणार कसे असा प्रश्न श्री खतिब यांनी केला आहे दरम्यान चार दिवस लाठी काढून टाकण्यात आल्यामुळे बांद्याच्या बाजारपेठेत चैतन्य होते अनेक दिवसांनी व्यापारी तसेच सर्वसामान्य खूश होते परंतू पुन्हा लाठी बंद झाल्यामुळे त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे त्यामुळे याबाबत तात्काळ योग्य ती भूमिका घेवून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी श्री खतिब यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून केली आहे
