आम दीपक केसरकर यांचा पुढाकार;अशोक दळवी यांच्याहस्ते वाटप
*⚡सावंतवाडी ता.०५-:* ओटवणे येथे महापुरामुळे घराचे नुकसान झालेल्यांना शिवसेनेच्या वतीने सिमेंट पत्र्याचे वाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका ओटवणे,विलवडे सरमळे वाफोली या गावांना बसला होता. या महापुरात शेतकऱ्यांच्या शेती व्यतिरिक्त घराचे मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. त्यात ओटवणे येथील विठोबा केरकर व भिवसेन गावकर या ग्रामस्थांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यांना मदत म्हणून माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वतीने सिमेंट पत्र्यांचे वाटप व उप जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार समिती सदस्य गजानन नाटेकर ओटवणे गावातील पूरग्रस्त लाभार्थी तसेच ओटवणे सरपंच उत्कर्षा गावकर माझगाव शिवसेना विभागप्रमुख संजय माजगांवकर उपविभागप्रमुख प्रथमेश गावकर ग्रामपंचायत सदस्य महादेव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते
