Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्ह्यात आज आणखी ५७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४६ हजार ८४६कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १हजार ९९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read Full News

निसर्गाचा प्रकोप राज्यकर्त्यांमुळेच

वृक्षमित्र सेवा संघाच्या सभेत प्रा. महेंद्र नाटेकर यांचा आरोप *⚡कणकवली ता.१८-:* गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली , नद्यांना महापूर आले . नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या . नद्यांचे पाणी नद्या किनाऱ्याच्या गावागावात , शहरा -शहरात घुसले. पुराबरोबर काही लोक वाहून गेले घरे पडली. वित्तहानी बरोबरच मनुष्य हानीही झाली .भूस्खलन झाले आणि माणसे त्यात गाडली गेली…

Read Full News

…म्हणून महाराष्ट्र शासनाचा गुणगौरव करावा तेवढा थोडाच आहे

प्रा . महेंद्र नाटेकर यांची उपरोधिक घणाघाती टिका *⚡कणकवली ता.१८-:* कोरोनाचे निमित्त करुन अत्यल्प काळ शाळा कनिष्ठ महाविद्यालये सुरु असल्याने अध्यापन – अध्ययन प्रक्रिया ठप्प झाली होती , ऑनलाईन शिक्षण पध्दतीने अध्यापन करण्याचा प्रयत्न झाला असला तरी इंटरनेट व अन्य सुविधा पुरेशा नसल्याने सुमारे ३० % च विद्यार्थ्यांनाच त्याचा लाभ झाला . अशा स्थितीत विद्यार्थ्यांच्या…

Read Full News

माध्यमिक विद्यामंदिर कनेडीचे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत यश

विजेत्या स्पर्धकांचा सतीश सावंत यांनी केला हस्ते गौरव *⚡कणकवली ता.१८-:* ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री एम्. एम्. सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी प्रशालेमार्फत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत…

Read Full News

“नको जामिन,नको तारण,मुद्रा योजनेचे हेच धोरण”या धोरणाप्रमाणे कर्ज द्या

हक्क बचाव महाराष्ट्र कर्जदार , जामिनदार संघर्ष समिती राष्ट्रीयकृत बँकांकडे मागणी *⚡कणकवली ता.१८-:* हक्क बचाव महाराष्ट्र कर्जदार , जामिनदार संघर्ष समिती मार्गदर्शक आप्पासाहेब घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड.प्रसाद करंदीकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँक व्यवस्थापकांना “नको जामिन,नको अनुषंगिक तारण,मुद्रा योजनेच हेच धोरण”याप्रमाणे कर्ज द्या…!!अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.तसेच मुद्रा कर्ज योजनेचे…

Read Full News

अतिवृष्टी व पूरबाधित दुकानदार, व्यापारी, टपरीधारकांना ५ ते ६ टक्के व्याजदराने कर्ज

जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी घेतला पुढाकार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय *⚡मुंबई, दि.१८-:* राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी…

Read Full News

पाडलोस-केणीवाडा स्ट्रीटलाइट गणेशोत्सवापूर्वी सुरू करा : हर्षद परब

*⚡बांदा दि.१८-:* मे महिन्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळात पाडलोस-केणीवाडा येथील स्ट्रीट लाईटचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर गेले चार महिने स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत आहे. गणेश चतुर्थीपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्ट्रीट लाइट सुरू करावी अशी मागणी, पाडलोस ग्रामपंचायत माजी सदस्य तथा भाजप बुथ उपाध्यक्ष हर्षद परब यांनी केली आहे.हर्षद परब म्हणाले की, गणेश चतुर्थीला वाडीतील…

Read Full News

विज समस्यांबाबत ओसरगाव ग्रामस्थांचे महावितरण कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या

लेखी आश्‍वासनानंतर ठिय्या आंदोलन घेतले मागे *⚡कणकवली ता.१८-:* ओसरगाव येथील विज समस्यांबाबत वारंवार निवेदन देऊन देखील त्याची दखल महावितरणकडून घेण्यात आलेली नाही.कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला ओसरगाव येथील वीज समस्या सोडविण्याबाबत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत केबिन मधून उठणार नाही. असा इशारा ओसरगाव सरपंच प्रमोद कावले यांच्यासह ग्रामस्थांनी कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांना…

Read Full News

सुरेश प्रभूंच्या मानव साधन विकास संस्थेच्यावतीने सायकल वाटप सुरूच

सावंतवाडीतील १० गरजूंना केले वाटप *⚡सावंतवाडी ता.१८-:* मानव साधन विकास संस्था संचलित परिवर्तन केंद्र यांच्या संकल्पनेतून आणि गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेकांना सायकलचे वितरण करण्यात येत आहे. आज सावंतवाडी येथे काझी शहाबुद्दीन हॉल येथे माजगाव हायस्कूल…

Read Full News

संजना सावंत यांनी उपोषणकर्त्यांना दिलेला शब्द पाळला

सोमवारी बैठक घेत सोडविल्या समस्या;सर्वांनी व्यक्त केले समाधान *⚡ओरोस ता.१८-:* जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी दिलेल्या शब्दाला जागत १५ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसलेल्या व्यक्तींना न्याय दिला आहे. १५ ऑगस्ट रोजी पाच उपोषणस्थळी भेट देत त्यांना सोमवारी आपले प्रश्न सोडविले जातील, असा शब्द दिला होता. त्यानुसार सोमवारी सौ सावंत यांनी बैठक घेत हे सर्व प्रश्न…

Read Full News

You cannot copy content of this page