निसर्गाचा प्रकोप राज्यकर्त्यांमुळेच

वृक्षमित्र सेवा संघाच्या सभेत प्रा. महेंद्र नाटेकर यांचा आरोप

*⚡कणकवली ता.१८-:* गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली , नद्यांना महापूर आले . नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या . नद्यांचे पाणी नद्या किनाऱ्याच्या गावागावात , शहरा -शहरात घुसले. पुराबरोबर काही लोक वाहून गेले घरे पडली. वित्तहानी बरोबरच मनुष्य हानीही झाली .भूस्खलन झाले आणि माणसे त्यात गाडली गेली . निसर्गाच्या प्रकोपाला सर्वस्वी शासन आणि प्रशासनच जबाबदार आहे . असा घणाघात वृक्षमित्र सेवा संघाचे अध्यक्ष प्रा . महेंद्र नाटेकर यांनी केला . वृक्षमित्र सेवा संघाची सभा सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित केली होती . त्यावेळी प्रा . नाटेकर बोलत होते . यावेळी प्रा . सुभाष गोवेकर , वाय. जी.राणे , प्रकाश नाडकर्णी , रमेश कुबल , महेश सावंत , पंढरी खटावकर , शंकर , परब , वसंत गांवकर , इ . उपस्थित होते . प्रा . नाटेकर पुढे म्हणाले , राज्यकर्त्यांच्या आशिर्वादाने होणारी वृक्षांची कत्तल , अवैध बांधकामे , खाण उत्खनन , रासायनिक प्रकल्प , औष्णिक प्रकल्प , मोकाट गरे आणि बेजबाबदार नागरिक कारणीभूत आहेत . प्राचीन काळापासून निसर्गदत्त घनदाट जंगले होती . त्यातून प्राणवायूचा भरपूर पुरवठा होऊन लोकांचे आरोग्य चांगले असे लोकही गरजेपुरतीच वृक्षतोड करीत असत . अगदी ब्रिटिश काळातही वृक्षतोड केल्यास फॉरेस्टर कठोर शिक्षा करीत असत . स्वातंत्र्याबरोबरच स्वैराचारही आला . पैसे मिळविण्यासाठी प्रचंड वृक्षतोड करतात आणि वनाधिकारी चिरीमिरी घेऊन गप्प बसतात. त्यामुळे हा सर्व नाश ओढवला आहे . पावसाळ्यात वृक्षांवर पावसाचा वर्षाव होतो . वृक्षांच्या पानांवर पडलेले पाणी थेंबाथेंबाने जमिनीवर पडून जमिनीत मुरते . ते खोल भूगर्भात जाते आणि झन्याच्या रुपाने संथगतीने बाहते . असे असंख्य झऱ्याचे पाणी एकत्र येऊन वाहती नदी बनते . लोक त्याच्यावर आपली शेती- बागायती करतात.वृक्षांची पाळे जमीन पकडून ठेवल्यामुळे माती वाहून जाऊन नद्या उथळ होण्याचा प्रश्नच येत नाही . भूपृष्ठावरील चारा हे आच्छादन असते . त्यांची सूक्ष्मपाळे नऊ इंचापर्यंत जाऊन भूपृष्ठावरील पाणी भूगर्भात सोडतात . तेही पाणी भूगर्भात खोलवर जाऊन झऱ्याच्या रुपाने नदीत प्रवाहीत होते . हा चारा भूपृष्ठाला घट्ट पकडून ठेवत असल्याने माती वाहत नाही . आता लोक फारशी शेती करीत नाहीत आणि गुरे मोकाट सोडतात त्यामुळे त्यांच्या खुरांनी माती विस्कटली जाते व पाणी भूगर्भापर्यंत सोडण्याची प्रक्रिया बंद पडते , अवैध बांधकामामुळे पाणी अडविले जाते.खाण उत्खननामुळे वृक्षांची पाळेमुळे खणून टाकली जातात . रासायनिक , औष्णिक प्रकल्पामुळे वृक्षामुळे हवेत गारवा असतो . आता वृक्षतोड , रासायनिक , औष्णिक प्रकल्पामुळे हवेत तापमान वाढत असल्याने पावसाचे प्रमाणही वाढले आहे . हवेच्या तापमानामुळे हवेचे दाब ठिकठिकाणी बदलत असल्याने एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होते . तर काही ठिकाणी अनावृष्टी होऊन दुष्काळ पडतो . पर्यावरण बदल होऊन अनेकांचे बळी जातात.याला शासन व प्रशासनच जबाबदार असल्याने केवळ बाधित लोकांना मतांच्या आशेने तात्पुर्ती आर्थिक मदत देऊन हा प्रश्न सुटणार नाही.त्यासाठी शासन – प्रशासनावर लोकांचा अंकुश पाहिजे . झालेल्या चर्चेत उपस्थित सर्वांनी सहभाग घेतला . वाय. जी. राणे यांनी आभार प्रदर्शन केले .

You cannot copy content of this page