*सिंधुदुर्गातील पहिल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिपला उत्स्फूर्त प्रतिसाद…

भोसले सैनिक स्कूलचे आयोजन..

⚡सावंतवाडी ता.०१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ ला विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भोसले नॉलेज सिटी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून स्पर्धेची रंगत वाढवली._

रनिंग, सायकलिंग आणि रायफल शूटिंग या तीन क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत स्पर्धकांची वेग, सहनशक्ती, एकाग्रता आणि अचूकता यांची कसोटी लागली. तिन्ही प्रकारांतील एकत्रित गुणांच्या आधारे विजेते निश्चित करण्यात आले. विविध वयोगटांमध्ये आयोजित या स्पर्धेने लहान वयातील खेळाडूंना आपल्या सर्वांगीण क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली.

स्पर्धेतील निकालांमध्ये ८ ते १० वर्षे मुली गटात स्पृहा भूषण नार्वेकर हिने प्रथम, काव्या अर्जुन राऊळ हिने द्वितीय व अमारा बिर्ला हिने तृतीय क्रमांक मिळविला. ८ ते १० वर्षे मुलांच्या गटात अंश राजेश राऊळ याने प्रथम, आराध्य राजन गोवेकर याने द्वितीय, तर अधृत स्नेहल गावेकर याने तृतीय क्रमांक मिळविला. ११ ते १४ वर्षे मुली गटात मैथिली सचिन गावडे हिने प्रथम, आस्था अमित लिंगवत हिने द्वितीय तर सौम्या दत्ताराम मेस्त्री हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. ११ ते १४ वर्षे मुलांच्या गटात करण आनंद गवळी याने प्रथम, दत्ताराम प्रवीण गवस याने द्वितीय तर रुद्रवीर आदर्श सैनी याने तृतीय क्रमांक पटकावला.

बक्षीस वितरण समारंभ भोसले नॉलेज सिटीचे सीईओ तथा भोसले सैनिक स्कूलचे कमांडंट ले.कर्नल रत्नेश सिन्हा (नि.) आणि यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्याचे कौतुक करत नियमित सराव, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भोसले नॉलेज सिटीच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page