*⚡बांदा दि.१८-:* मे महिन्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळात पाडलोस-केणीवाडा येथील स्ट्रीट लाईटचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर गेले चार महिने स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत आहे. गणेश चतुर्थीपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्ट्रीट लाइट सुरू करावी अशी मागणी, पाडलोस ग्रामपंचायत माजी सदस्य तथा भाजप बुथ उपाध्यक्ष हर्षद परब यांनी केली आहे.हर्षद परब म्हणाले की, गणेश चतुर्थीला वाडीतील भजनी मंडळे सर्वत्र भजनासाठी फिरतात. तसेच नागरिकांनाही काळोखातून वाट शोधावी लागत आहे. तौक्ते वादळानंतर गेले चार महिने स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने प्राधान्याने लक्ष देणे आवश्यक आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता गणेशोत्सवापूर्वी स्ट्रीट लाइट सुरू व्हावी अशी मागणी हर्षद परब यांनी केली. पुढे ते म्हणाले की, आम्ही सत्तेत असताना विरोधकांनी स्ट्रीटलाइट वरून मोठा गाजावाजा केला होता. केणीवाडा स्ट्रीट लाईट बंद असून आता त्यावेळचे विरोधक सत्तेत असताना सद्यस्थितीत गप्प का असा टोलाही हर्षद परब यांनी लगावला. दरम्यान, सरपंच अक्षरा पाडलोसकर यांच्याशी संपर्क साधला असता स्ट्रीट लाईट वाहिन्याना लागणारी झुडपे तोडणे व नवीन वीज वाहिन्या ओढण्याचे काम लवकरच सुरू करणार आहोत. बांदा कनिष्ठ सहाय्यक अभियंता यांच्या चर्चा झाली असून गणेशोत्सवपूर्वी स्ट्रीट लाईट सुरू होणार असल्याचे सरपंच सौ. पाडलोसकर यांनी सांगितले.
पाडलोस-केणीवाडा स्ट्रीटलाइट गणेशोत्सवापूर्वी सुरू करा : हर्षद परब
