जीएसटी कार्यालयात व्यवसाय कर दिन साजरा
*⚡ओरोस ता.०१-:* महाराष्ट्र राज्य व्यवसायकर विभागामार्फत आज सिंधुदुर्गनगरी येथील वस्तू व सेवा कर कार्यालयामध्ये व्यवसायकर दिन साजरा करण्यात आला. कोल्हापूर क्षेत्राच्या राज्य सहआयुक्त वैशाली काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिंधुदुर्गचे राज्यकर उपायुक्त प्रताप अजगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी व्यवसायिकांनी वेळेत व्यवसाय कर भरावा असे आवाहन श्री. अजगेकर यांनी केले. उपस्थितांचे स्वागत आणि आभार…
