सावंतवाडी कवठणीमार्गे तळवणे वेळवेवाडी एसटी फेऱ्या सुरू कराव्यात

शिवसेना ओबीसी सेल तालुकाप्रमुख संदेश कवठणकर यांची आगारप्रमुखांकडे मागणी

*⚡सावंतवाडी ता.०१-:* सावंतवाडी ते कवठणीमार्गे तळवणे वेळवेवाडीपर्यंत सुटणाऱ्या एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने शिवसेना ओबीसी सेल सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा शिवसेना आरोंदा विभागीय संघटक संदेश कवठणकर यांनी सावंतवाडी आगारप्रमुख वैभव पडोळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी सुधा कवठणकर, रुपेश कवठणकर, समीर सावंत आदी उपस्थित होते. या निवेदनात कवठणकर यांनी म्हटले की, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे २०२० पासून सावंतवाडी ते कवठणीमार्गे तळवणे वेळवेवाडीपर्यंतच्या एसटीच्या सर्व फेऱ्या बंद आहेत. परिणामी कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. तसेच आता शाळा व कॉलेज सुरू होत आहेत. या बससेवा बंद असल्याने शाळा व कॉलेज साठी ये-जा करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची बरीच गैरसोय होणार आहे. त्यामुळे लोकांचे आर्थिक व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गोष्टींचा विचार करून सावंतवाडी ते तळवणे वेळवेवाडी पर्यंतच्या एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू करून येथील जनतेस सहकार्य करावे, कवठणकर यांनी म्हटले आहे. यावेळी आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी या सर्व बससेवा लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन कवठणकर यांना दिले, असल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page