आंजिवडे घाटाचा प्रश्न सुटला…

भाजप युवा नेते विशाल परब यांची माहिती;

*⚡कुडाळ ता.०१-:* सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा आंजिवडे घाट रस्त्याचा प्रश्न सुटला असून, त्याबाबतचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले आहे. या घाटाची पुढील सर्व जबाबदारी खासदार नारायण राणे यांनी घेतली आहे. अशी माहिती देताना भाजप युवा नेते विशाल परब यांनी फुक्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये असा टोला लगावला आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, येत्या काही दिवसात माजी खासदार निलेश राणे आंजिवडे घाटाची पाहणी करणार आहेत, असे त्यांनी सांगितले. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून हा घाट रस्ता होण्यासाठी सर्वे झाला होता. यात कुडाळ तालुक्यातील गावे थेट कोल्हापूरला जोडले जाणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर-सिंधुदुर्ग अंतर बऱ्यापैकी कमी होणार आहे. या घाट रस्त्यामुळे परिसरातील गावांचा विकास होणार आहे, असे परब म्हणाले.

You cannot copy content of this page