शहरात पुन्हा एकदा स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेस सुरुवात

नागरिकांनी करावे सहकार्य; आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांचे आवाहन

सावंतवाडी ता.०१-:शहरात पालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वच्छ सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत असून, त्याचा शुभारंभ आज संत गाडगेबाबा भाजी मंडई येथून करण्यात आला आहे. यावेळी तेथील व्यापाऱ्यांना कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत मार्गदर्शन करून, प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तसेच यावेळी पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी पुन्हा राबवण्यात येत असलेल्या या मोहिमेला शहरातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी केले आहे. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, आनंद नेवगी दिपाली भालेकर, दिपाली सावंत, राजू बेग, सुरेंद्र बांदेकर, रसिका नाडकर्णी, देविदास आडकर, विजय बांदेकर, पांडुरंग नाटेकर, निवेद कांबळी, संजीवनी शिरसाट आदींसह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. यावेळी सुका कचरा, ओला कचरा, धोकादायक कचरा व घरगुती घातक कचरा असे वर्गीकरण करून नागरिकांनी आपल्या घरातील कचरा घंटागाडी वर द्यावा जेणेकरून त्याचा त्रास सफाई कर्मचाऱ्यांना होणार नाही, असे आवाहन सौ नाडकर्णी यांनी केले. दरम्यान त्याचे वर्गीकरण कसे करावे, याचे प्रात्यक्षिक व्यापाऱ्यांना दाखविण्यात आले. तर माझी व सुंदर अभियानांतर्गत उपस्थितांना हरित शपथ देण्यात आली. याप्रसंगी पालिकेचे सफाई कर्मचारी गणेश खोरागडे, जयवंत जाधव, मोहन कांबळे, बबन जाधव, युवराज मेहत्तर आदींचा यावेळी शाल-श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

You cannot copy content of this page