Headlines

भाजपाकडून तळवणे येथील कातकरी समाजाला धान्य वाटप…

उपनगराध्यक्ष अँड.अनिल निरवडेकर यांचा पुढाकार: प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य…

⚡सावंतवाडी ता.२१-:
सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथील कातकरी समाजाच्या पाड्यावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने विशेष उपक्रमाचे आयोजन करत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. “भाजपा नेहमी तुमच्या सोबत आहे,” असा विश्वास देत या ठिकाणी कातकरी समाजातील बांधवांना धान्य वाटप करण्यात आले. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कातकरी बांधवांसोबत केक कापून त्यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांच्या विशेष पुढाकारातून या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मदत आणि आपुलकी मिळाल्याने भावूक झालेल्या कातकरी समाज बांधवांनी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांना उदंड व दीर्घायुष्य लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

या कार्यक्रमाला तळवणे ग्रामपंचायत सदस्य सावळाराम घाट्ये यांच्यासह स्थानिक बूथ अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page