सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांच्या मडूरे-परबवाडी येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री दीपकभाई केसरकर यांनी दर्शन घेतले.
यावेळी दीपकभाई केसरकर यांनी गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा करून आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मडूरे गावचे सरपंच उदय चिंदरकर, आबा केसरकर, वामन नार्वेकर, संतोष नार्वेकर, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परब कुटुंबीय आणि स्नेही उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी गणरायाचे दर्शन घेतले.
