सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या निवासस्थानी भाजप युवा नेते विशाल परब आणि सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी सदिच्छा भेट देत श्री गणरायाचे दर्शन घेतले.
यावेळी सोशल मीडिया संयोजक केतनजी आजगावकर उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात श्री गणरायाचे दर्शन घेत उपस्थितांनी आशीर्वाद घेतले. यानंतर विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा झाल्या. या सदिच्छा भेटीमुळे गणेशोत्सवाच्या आनंदात आणखी भर पडली.
