Headlines

बांद्याचा बाप्पा ठरला ‘नंबर वन’; न्यूज १८ मराठीच्या स्पर्धेत सिंधुदुर्गातून प्रथम…

⚡बांदा ता.२१-: न्यूज १८ मराठी या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ मध्ये बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सव गांधीचौक मंडळाच्या ‘बांद्याचा बाप्पा’ या गणेशोत्सव मंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. सर्वाधिक मते मिळवत ‘बांद्याचा बाप्पा’ विजेता ठरला असून, मंडळाला प्रथम क्रमांकाचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे या स्पर्धेत सहभागी झाली होती. गेली ६१ वर्षांची परंपरा असलेल्या ‘बांद्याचा बाप्पा’ मंडळाने सर्वाधिक मते मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष भाऊ वाळके यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, मंडळाचे उपाध्यक्ष नीलेश ऊर्फ पापू कदम, खजिनदार निखिल मयेकर, सचिव गौरव नाटेकर, मंडळाचे पदाधिकारी सर्वेश गोवेकर, प्रसाद वाळके, साईप्रसाद काणेकर, ऋषी हरमलकर, ओंकार नाडकर्णी, सिद्धेश शिरोडकर, अक्षय मयेकर, ज्ञानेश्वर येडवे, राकेश केसरकर, राकेश विरनोडकर, हुमंतत नाटेकर, निल भिसे, स्वामी पावसकर, वल्लभ पडते, अजिंक्य पावसकर, रुद्र वाळके, भाजप शहराध्यक्ष निलेश नाटेकर, माजी शहराध्यक्ष बाबा काणेकर, दर्पण आळवे, अर्णव स्वार यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मंडळाचा ६१ वर्षांचा गणेशोत्सवाचा प्रवास
‘बांद्याचा बाप्पा’ मंडळाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सर्वेश गोवेकर यांनी सांगितले की, गेली ६१ वर्षे मंडळ गणेशोत्सव साजरा करीत असून, सामाजिक बांधिलकीही जपली जाते. प्रथमच या स्पर्धेत सहभागी होऊन पहिला क्रमांक पटकावल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
‘मंडळाचे कार्यकर्ते, बांदावासीयांचा हा सन्मान’
‘बांद्याचा बाप्पा’ला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. हा सन्मान केवळ मंडळाच्या कार्यकर्त्यांचा नसून, बांदावासीयांच्या प्रेमाचा व पाठिंब्याचा आहे. यापुढेही मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सवाबरोबरच सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
फोटो:-
बांदा येथे मंडळाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देताना युवा नेते विशाल परब. सोबत इतर मान्यवर व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते.

You cannot copy content of this page