Headlines

Global Maharashtra Breaking News

देवगड काँग्रेसने साजरी केली गांधी जयंती

देवगड देवगड तालुका राष्ट्रीय काँग्रेस तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५२ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या वेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य नंदकुमार कांदळगावकर, जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर, सुरज घाडी, शहराध्यक्ष. उमेश कुळकर्णी उपस्थित होते.

Read More

विधी सेवा योजना यावर रॅली संपन्न

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिधुदुर्ग यांचे आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते १४ ऑक्टोंबर कालावधीत पॅन इंडिया अवेअरनेस अॅण्ड कायदेशीर जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन २ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला दिवाणी न्यायाधीश श्रीमती के.के.पाटील…

Read More

घंटागाडी व वेंगुर्ला नगरपरिषद‘ अॅपचे अनावरण

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे पुरविण्यात येणा-या सेवा व योजनांचा लाभ घेणे सोईची व्हावे तसेच स्वच्छता अभियानांतर्गत होणारे विविध कार्यक्रम व सुविधांच्या माहितीसाठी बनविण्यात आलेल्या ‘घंटागाडी व वेंगुर्ला नगरपरिषद‘ या अॅपचे अनावरण आज नगरपरिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मोबाईल अॅप्लिकेशनचा उपयोगी शहरातील कचरा संकलन सहज होण्यास व शहरातील मालमत्तांचा आढावा…

Read More

भाजपला फायदा होऊ नये यासाठी तडजोड करण्याची तयारी

तरीही सतरा प्रभागात तयारी करणार राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय:जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती *⚡सावंतवाडी ता.०२-:* आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. यावेळी नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला फायदा होऊ नये यासाठी तडजोड करण्याची आपली तयारी असल्याचे मत जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केले आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी आपण 17 वॉर्ड मधून तयारी करणार…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सायकल रॅलील उत्स्फूर्त प्रतिसाद

*⚡वेंगुर्ला ता.०२-:* वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१ अंतर्गत आज (२ ऑक्टोबर) आयोजित केलेल्या सायकल रॅलील सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडोच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहात ही रॅली यशस्वी केली. वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर राहिली असून त्या अनुषंगाने दि.२६ जुलै ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत नगरपरिषदेतर्फे स्वच्छता व पर्यावरण संवर्धन जनजागृती सप्ताह आयोजित…

Read More

समाजामध्ये कायदेविषयक साक्षरता निर्माण व्हावी हाच अभियानाचा उद्देश

कायदेविषयक साक्षरता अभियान शिबिरप्रसंगी न्या. सलीम जमादार यांचे प्रतिपादन *⚡कणकवली ता.०२-:* पॅन इंडिया जनजागृती व संपर्क अभियानाच्या माध्यमातून गावा – गावांमध्ये कायदेविषयक माहिती पोहोचविली जाणार आहे . कायदा सर्वांसाठी समान असून मोफतही आहे . अर्थात याविषयीच प्रत्येक गावामध्ये जनजागृती केली जाणार आहे . समाजामध्ये कायदेविषयक साक्षरता निर्माण व्हावी , हाच या अभियानाचा उद्देश असल्याची माहिती…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ६७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०२-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४९ हजार ६१५ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ६८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

जिल्हा परिषदेचा स्वच्छ भारत दिवस उत्साहात साजरा

जिल्हाभर कार्यक्रमांचे आयोजन *⚡ओरोस ता.०२-:* स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत महात्मा गांधी जंयती निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आयोजित ‘स्वच्छ भारत दिवस’ उत्साहत पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या उपस्थीत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जंयती हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणुन संबोधला जातो. जिल्हा…

Read More

काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

*⚡सावंतवाडी ता.०२-:* राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री याची जयंती सावंतवाडी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने काँग्रेसच्या कार्यालयात साजरी करण्यात आली . त्यावेळी जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष बाळा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप नार्वेकर, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सुनिल निरवडेकर, शहराध्यक्ष अँड . राघवेंन्द्र नार्वेकर, तालुका सरचिटणीस रुपेश आईर व…

Read More

काँग्रेसच्यावतीने कणकवलीत महात्मा गांधी जयंती साजरी

*⚡कणकवली ता.०२-:* राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 152 वी जयंती कणकवली तालुका काँग्रेस कार्यालयात साजरी करण्यात आली.यावेळी ज्येष्ठ कविवर्य व साहित्यिक महेश काणेकर यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर,तालुका सरचिटणीस व सांस्कृतिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीण वरूनकर ,कणकवली शहर अध्यक्ष महेश तेली, तालुका युवक अध्यक्ष निलेश तेली ,ज्येष्ठ कार्यकर्ते…

Read More
You cannot copy content of this page