भाजपला फायदा होऊ नये यासाठी तडजोड करण्याची तयारी

तरीही सतरा प्रभागात तयारी करणार राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय:जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती

*⚡सावंतवाडी ता.०२-:* आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक पार पडली. यावेळी नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला फायदा होऊ नये यासाठी तडजोड करण्याची आपली तयारी असल्याचे मत जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केले आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी आपण 17 वॉर्ड मधून तयारी करणार असून, महाविकास आघाडी बाबत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो अंतिम राहील असे देखील ते म्हणाले आहेत. यावेळी ते पुढे म्हणाले की, मागील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार काही थोडक्या मतांनी पराभूत झाले आहेत. त्यामुळे यावेळी तरी विषाची परीक्षा मित्रपक्षांनी घेऊ नये. असा सल्ला देखील जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिला आहे. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, पक्षनिरीक्षक शिवाजी घोगळे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, हिदायत्तुला खान, शफीक खान, अशोक पवार, आशिष कदम, दर्शना बाबर – देसाई आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page