*⚡वेंगुर्ला ता.०२-:* महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिधुदुर्ग यांचे आदेशान्वये तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते १४ ऑक्टोंबर कालावधीत पॅन इंडिया अवेअरनेस अॅण्ड कायदेशीर जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन २ ऑक्टोबर रोजी वेंगुर्ला दिवाणी न्यायाधीश श्रीमती के.के.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर दिवाणी न्यायायलय, हॉस्पिटल नाका, मारुती स्टॉप, रामेश्वर मंदिर, राऊळवाडा ते पॉवर हाऊस या मार्गे विधी सेवा योजना या विषयावर रॅली काढण्यात आली. या रॅलीत बॅ.खर्डेकर महाविद्यालय, पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला हायस्कूलचे एनसीसीचे तसेच वेंगुर्ला हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, वकिल, न्यायालयीन कर्मचारी, विधी स्वयंसेवक व इतर उपस्थित होते. तत्पूर्वी वेंगुर्ला न्यायालय परिसरात न्यायाधीश के.के.पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
विधी सेवा योजना यावर रॅली संपन्न
