Headlines

Global Maharashtra Breaking News

समर्पित निधी प्राप्त करुन घेण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार

पालकमंत्री उदय सामंत *⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-:* सन 2021 – 22 या आर्थिक वर्षातील माहे ऑक्टोबर अखेर 170 कोटी मुळ अर्थसंकल्पीय तरतुदीच्या 9.18 टक्के खर्च झाला आहे तसेच अनुसुचित जाती उपयोजनेच्या मुळ अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 27.44 टक्के खर्च झाला आहे. समर्पित केलेला 44 कोटी 55 लक्ष निधी पुन्हा प्राप्त करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय…

Read More

कणकवली पंचायत समिती नूतन इमारत उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला

आमदार नितेश राणे यांनी दिली माहिती *⚡कणकवली ता.१६-:* केंद्रीय मंत्रीमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक नवी दिल्ली येथे तातडीने आयोजित करण्यात आल्याने कणकवली पंचायत समिती नुतन इमारतीचा १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता उद्घाटन समारंभ रद्द करण्यात आल्याचे आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. तसेच पुढील तारीख निश्चित झाल्यावर सर्वांना कळविण्यात येईल असेही…

Read More

विधी सेवा सप्ताहाचा समारोप

*⚡वेंगुर्ला ता.१६-:* वेंगुर्ला दिवाणी न्यायालयाच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विधी सेवा सप्ताहाचा समारोप येथील दिवाणी न्यायालयात दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. तसेच या सप्ताहानिमित्त आयोजित स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेल्या…

Read More

काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी विल्यम सालढाणा

*⚡सावंतवाडी ता.१६-:* काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी चराठा माजी सरपंच विल्यम सालढाणा यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष व्हीक्टर फर्नांडिस यांनी ही निवड केली आहे. विल्यम सालढाणा कॅथलिक बँकेचे विद्यमान संचालक असून त्यांनी या बँकेचे व्हाईस चेअरमनपदही भूषविले आहे. तसेच तेअल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष…

Read More

विद्युत कारंजा पुन्हा लखलखणार

भाजप पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी;लवकरच दुरुस्तीचे काम घेणार हाती *⚡सावंतवाडी ता.१६-:* शहराच्या पर्यटनदृष्ट्या विकासासाठी येथील मोती तलावातील बंद असलेला विद्युत कारंजा पुन्हा सुरू करण्याचा सत्ताधारी भाजपने निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने कारंजाची आज पाहणी करण्यात आली. यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, शहराध्यक्ष अजय गोंदावळे,अमित परब, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. लवकरच हा कारंजा…

Read More

ओंकार युवक कला क्रीडा मंडळ सातवायगणी आयोजीत दीपावली शोटाइम उत्साहात

सरपंच गीतांजली कांबळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला शुभारंभ *⚡सावंतवाडी ता.१६-:* ओंकार युवक कला क्रीडा मंडळ सातवायगणी आयोजीत दीपावली शोटाइम स्पर्धेचा मोठया उत्साहात सरपंच गीतांजली कांबळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला. वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर सातवायंगणी येथील ओमकार कला क्रीडा मंडळ यांनी दीपावलीनिमित्त दीपावली शो टाइम या सांस्कृतिक महोत्सवाचाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचा शुभारंभ पेंडूर…

Read More

नाम.नारायण राणे यांना अंधारात ठेवत कार्यक्रम उरकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न

कणकवली शिवसेनेचा पंचायत समिती सत्ताधार्‍यांवर आरोप *⚡कणकवली ता.१६-:* कणकवली पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम हे शासनाच्या निधीमधून 2016 मध्ये मंजूर झाले. त्यामुळे या नवीन इमारतीचे उद्घाटन करताना प्रशासकीय कार्यक्रम म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी निमंत्रण पत्रिका काढण्याची गरज होती. पण हे धारिष्ट्य सभापती व सहकारी दाखवू…

Read More

आठ दिवसात रस्ता सुस्थितीत करा

मनसेची नगरपरिषदेला डेडलाईन;अन्यथा मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा दिला इशारा *⚡सावंतवाडी ता.१६-:* सावंतवाडी सबनीसवाडा येथील प्रांत कार्यालय ते जिमखाना महापुरुष मंदिर तेथून ते चार नंबर शाळेपर्यतचा रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. तर त्यातच जिओ केबलसाठी चर खोदण्यात आला असून हे चर योग्य रीतीने भरण्यात न आल्याने भराव खचून वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी अपघात झाल्यास…

Read More

इंडियन टॅलेंट सर्च राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत कनेडी हायस्कूलचे यश

तनुश्री मसुरकर राज्य गुणवत्ता यादीत तृतीय *⚡कणकवली ता.१६-:* इंडियन टॅलेंट सर्च, वरळी मुंबई मार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेत कनेडी हायस्कूलने घवघवीत यश संपादन करून प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. कु.तनुश्री प्रसाद मसुरकर हिने राज्यगुणवत्ता यादित तृतीय क्रमांक प्राप्त केला असून शिष्यवृत्तीची मानकरी ठरली असून भारताची अव्वल धावपटू तसेच ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. टी….

Read More

मुबंई मुलुंड येथे २८ नोव्हेंबरला गजर हरिनामाचा भजन महोत्सव

*⚡कणकवली ता.१६-:* महाराष्ट्राचा सर्वात प्राचीन सांस्कृतिक ठेवा म्हणजे भजन आहे. महाराष्ट्राचा हा अमूल्य ठेवा जतन करणे , त्याचा प्रसार करणे , वृद्धिंगत करणे यासाठी अनेक भजनप्रेमी , वारकरी माऊली यांचे योगदान आहे. भजनाला अध्यात्मिक अधिष्ठान आहे.घावनळे गाव रहिवाशी संघ मुंबई व ग्रामस्थ मित्रपरिवाराच्या पदसेवकांच्यावतीने “गजर हरिनामाचा ” या नावाने अभंग वाणी भजन महोत्सव व सत्यनारायणाची…

Read More
You cannot copy content of this page