नाम.नारायण राणे यांना अंधारात ठेवत कार्यक्रम उरकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न

कणकवली शिवसेनेचा पंचायत समिती सत्ताधार्‍यांवर आरोप

*⚡कणकवली ता.१६-:* कणकवली पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे काम हे शासनाच्या निधीमधून 2016 मध्ये मंजूर झाले. त्यामुळे या नवीन इमारतीचे उद्घाटन करताना प्रशासकीय कार्यक्रम म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी निमंत्रण पत्रिका काढण्याची गरज होती. पण हे धारिष्ट्य सभापती व सहकारी दाखवू शकले नाहीत.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अंधारात ठेवत कार्यक्रम उरकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. वास्तविक प्रोटोकॉल नुसार पालकमंत्री यांना या कार्यक्रमात बोलविणे आवश्यक होते मात्र प्रोटोकॉल डावलण्यात आला असल्याचा आरोप शिवसेना कणकवली शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी पत्रकार परिषद घेत केला. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषद शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले बोलत होते यावेळी त्यांच्या समवेत उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक कन्हया पारकर, माजी जि. प. कृषी सभापती संदेश पटेल, उपतालुकप्रमुख राजू राणे, ॲड. हर्षद गावडे आदी उपस्थित होते. शैलेश भोगले पुढे म्हणाले, पंचायत समितीच्या नवीन इमारती च्या कार्यक्रमाचे उद्घाटन गुपचूप उरकण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते येणार असे पंचायत समितीचे पदाधिकारी सांगत होते. पण विरोधी पक्ष नेत्यांनी वेळ दिला नाही असा टोला भोगले यांनी लगावला. पंचायत समितीच्या समोरील कामातील भ्रष्टाचाराच्या निविदा प्रक्रियेची चौकशी सुरू झाली आहे. बांधकाम उपअभियंता यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती भोगले यांनी दिली. असे असताना राजकारण म्हणून पालकमंत्र्यांना निमंत्रित करावे लागेल म्हणून छोटेखानी कार्यक्रम करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. या इमारतीच्या उद्घाटनाला आमचा विरोध नाही पण पंचायत व जिल्हा परिषद चा सुरू असलेला कारभार निषेधार्थ असून या कारभाराचा आम्ही निषेध करतो. या कार्यक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला. तर गटविकास अधिकाऱ्यांनी निमंत्रण पत्रिका छापली नसल्याचे सांगितले. त्याचे कॉल रेकॉर्डिंग ही आमच्याकडे उपलब्ध असल्याचा दावा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. केंद्रीय मंत्री राणे यांना अंधारात ठेवत कार्यक्रम उरकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे. पंचायत समितीच्या इमारतीसमोरील कामा संदर्भात निविदा प्रक्रिया बाबत सभापती यांच्याकडून अद्याप खुलासा नाही.प्रोटोकॉल पाळला जात नाही, असा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. ही इमारत पूर्ण होण्यासाठी साडेपाच वर्षे लागली. काम सुरू झाल्यानंतर पेवर ब्लॉक च्या कामाची निविदा काढून सुमारे 9 लाख 22 हजार घशात घालण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप कन्हैया पारकर यांनी केला. मात्र तो प्रयत्न तो शिवसेनिकांनी हाणून पाडला. या कामाची तक्रार केल्यानंतर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदर कामाच्या पाहण्यासाठी आले. मात्र हा सर्व भ्रष्टाचार लपवण्यासाठी शासनाला या कार्यक्रमाची कल्पना नाही असा आरोप श्री. पारकर यांनी केला. राणेंच्या हस्ते उद्घाटन केल्यावर भ्रष्टाचार माफ होईल अशी आशा सत्ताधाऱ्यांना असल्याचा आरोप पारकर यांनी केला. पण कणकवली पंचायत समिती सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार शिवसेना हाणून पडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा पारकर यांनी दिला. हे उद्घाटन नियमबाह्य असून आमची सत्ता आल्यावर आम्ही उद्घाटन करणार असेही माजी सभापती संदेश पटेल यांनी सांगितले. तसेच पदाधिकाऱ्यांनी या कामात भ्रष्टाचार झाला नाही हे सिद्ध करून दाखवावे असे आव्हान या वेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिले.

You cannot copy content of this page