Headlines

Global Maharashtra Breaking News

सेवानिवृत्त सेवक संघाची सभा

*⚡मालवण ता.२४-:* मालवण तालुका सेवानिवृत्त सेवक संघाची मासिक सभा रविवार दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता टोपवला हायस्कुल, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष मंगेश शेर्लेकर व सचिव दामोदर गवळी यांनी केले आहे.

Read More

वेंगुर्ले तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमधील ११ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक

तहसीलदार प्रवीण लोकरे यांची माहिती *⚡वेंगुर्ले ता.२४-:* वेंगुर्ले तालुक्यातील १० ग्रामपंचायतींमधील ११ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली. तालुक्यातील आणसूर, पाल, केळूस, खानोली, दाभोली, मोचेमाड, मेंढा, उभादांडा, भोगवे या नऊ ग्रामपंचायतीमध्ये रिक्त असलेल्या प्रत्येकी १ जागेसाठी आणि असोली येथील…

Read More

गोवा बनावट दारू वाहतूक केल्याप्रकरणी संशयितास एका दिवसाची पोलीस कोठडी

*⚡सावंतवाडी ता.२४-:* गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी वेत्ये येथे काल रात्री पोलिसांनी कारवाई करत बारामती येथील भानुदास चांदबुडे यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत 30 लाखाच्या दारुसह 20 लाखाचा आयशर कॅण्टर असे तब्बल 50लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला होता. आज त्याला न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read More

नांदगाव तिठ्यावर चिखलाचे साम्राज्य

कणकवली 24 नोव्हेंबर (प्रतिनिधी)- नांदगाव येथील हायवेच्या अर्धवट स्थितीत कामाबाबत आंदोलन झाल्यानंतर गटार व्यवस्थापन चे हायवे कंपनीने काम हाती घेतले आहे. एक साईट चा सर्व्हिस रोड पूर्ण करण्यात आल्याने तेथे गटाराचे काम पूर्ण केले जात आहे. यातच गेले काही दिवस पाऊस सुरू झाला असून तसेच गटार व्यवस्थापन साठी चरी खोदण्यात आली आहे यामुळे मातीचा ढीग…

Read More

मातोंड येथे मसाले प्रक्रिया उद्योगाला प्रारंभ…

मातोंड सरपंच तथा समूहाच्या सदस्या जानवी परब यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन वेंगुर्ले: तालुक्यातील मातोंड येथील गणेशदिप मसाला लघु उत्पादन महिला समूह, मातोंड – वरचेबांबर यांच्यामार्फत सर्व प्रकारचे मसाले प्रक्रिया उद्योगाला प्रारंभ करण्यात आला असून या उद्योगाचे उदघाटन मातोंड सरपंच तथा या समूहाच्या सदस्य जानवी जगदीश परब यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या महिलांनी…

Read More

मालवण नगरपरिषदेतर्फे उद्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची माहिती;आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान जिल्हास्तर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीतवस्ती सुधार योजना सन २०२०-२१ अंतर्गत मालवण नगरपरिषदेतर्फे मालवण शहरात होणाऱ्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उद्या दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत होणार…

Read More

कासरल गावातील तरुणांचा मनसेत प्रवेश

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले स्वागत *⚡कणकवली ता.२४-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कणकवली तालुक्यातील कासरल गावातील तरुणांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. माजी आम.मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते तरुणांनी मनसेचा झेंडा हातात घेतला. यावेळी उपविभाग प्रमुखपदी रणजित सावंत राजेश सावंत, लक्ष्मण बागवे, समीर सावंत, सिद्धेश सावंत, सागर सावंत,…

Read More

अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघातर्फे राज्यस्तरीय वधू – वर पालक परिचय मेळावा

*⚡कणकवली ता.२४-:* अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघ महाराष्ट्र् राज्य यांच्या वतीने चर्मकार समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधू – वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वा. जय पॅलेस मंगल कार्यालय,कोल्हापूर – गारगोटी रोड झाडाच्या गणपती जवळ,कळंबा, ता.करवीर येथे करण्यात आले असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र् चर्मकार समाज संघटनेच्या कोकण विभागाचे प्रमुख…

Read More

इचलकरंजी संस्कृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी अजय कांडर

आम. प्रकाश आवडे स्वागताध्यक्ष तर कादंबरीकार सुशील धसकटे प्रमुख पाहुणे *⚡कणकवली ता.२४-:* इचलकरंजी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे इचलकरंजी येथे रविवार 12 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील नामवंत कवी अजय कांडर यांची निवड करण्यात आली आहे. आमदार प्रकाश आवाडे स्वागताध्यक्ष असलेल्या या संमेलनाला कादंबरीकार सुशील धसकटे (पुणे) यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात…

Read More

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी घेतली ना. अजित पवार यांची भेट

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर झाली चर्चा *⚡कुडाळ ता.२४-:* खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी आज वित्त व नियोजन मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. चांदा ते बांदा योजनेतील जे प्रलंबित प्रस्ताव आहेत ते मंजूर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच कोविडमुळे…

Read More
You cannot copy content of this page