अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघातर्फे राज्यस्तरीय वधू – वर पालक परिचय मेळावा

*⚡कणकवली ता.२४-:* अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघ महाराष्ट्र् राज्य यांच्या वतीने चर्मकार समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधू – वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १० वा. जय पॅलेस मंगल कार्यालय,कोल्हापूर – गारगोटी रोड झाडाच्या गणपती जवळ,कळंबा, ता.करवीर येथे करण्यात आले असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र् चर्मकार समाज संघटनेच्या कोकण विभागाचे प्रमुख सहदेव कोंडविलकर यांनी दिली. श्री. रमेश टोनपे (कोल्हापूर ) यांच्या अध्यक्षतेखाली सम्पन्न होणाऱ्या या मेळाव्याला महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील वधू – वर उपस्थित राहणार आहेत.तसेच या मेळाव्याला डॉ.कौस्तुभ वसंत वाईकर (एम बी बी एस डि एन बी ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.इच्छुक वधू – वर यांनी मेळाव्याला येताना स्वतःचा फोटो व बायोडाटा सोबत घेऊन यावा तसेच कार्यक्रमाच्या १ तास अगोदर उपस्थित राहून नोंदणी करणे आवश्यक आहे.नोंदणीची फी ५०० /- रुपये असून मास्क लावणे बंधनकारक आहे. तरी चर्मकार समाजातील इच्छुक नव वधू – वर यांनी तसेच घटस्फोटित,विदुर,बिजवर यांनी या संधीचा लाभ घ्यावा.व अधिक माहितीसाठी रघुनाथराव मोरे – ९८९०८५ ८३३२(कोल्हापूर),विठ्ठल नांगरे – ९५७९६२९०२० (कोल्हापूर) सहदेव कोंडविकर – ९७६५०५९५८६ (कोकण ) यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन अखिल महाराष्ट्र् चर्मकार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page