कासरल गावातील तरुणांचा मनसेत प्रवेश

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले स्वागत

*⚡कणकवली ता.२४-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कणकवली तालुक्यातील कासरल गावातील तरुणांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. माजी आम.मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या हस्ते तरुणांनी मनसेचा झेंडा हातात घेतला. यावेळी उपविभाग प्रमुखपदी रणजित सावंत राजेश सावंत, लक्ष्मण बागवे, समीर सावंत, सिद्धेश सावंत, सागर सावंत, सुनील परब, संदीप सावंत, संजय सावंत, दीपक सावंत, राजू सावंत,सूर्यकांत सावंत या तरुणांनी प्रवेश केला. तरुणांना शुभेच्छा देताना मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर म्हणाले, राज्यात मनसे जनतेसाठी रस्त्यावर उतरते ,जनहिताची, समाजसेवेची कामे मनसेच्या माध्यमातून होताना दिसत असुन राजसाहेबांना मानणाऱ्या मनसेवर प्रेम करणाऱ्या तरुणाईने मनसेच्या या कामात पुढे होऊन सहभागी होण्याचं आवाहन देखील यावेळी परशुराम उपरकर केले. याप्रसंगी मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, तालुका अध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, तालुका सचिव संतोष कुडाळकर, उपतालुका अध्यक्ष अनंत आचरेकर,शांताराम सादये, दत्ताराम अमृते, गणेश कसवणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page