मालवण नगरपरिषदेतर्फे उद्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची माहिती;आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती

मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान जिल्हास्तर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीतवस्ती सुधार योजना सन २०२०-२१ अंतर्गत मालवण नगरपरिषदेतर्फे मालवण शहरात होणाऱ्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उद्या दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली आहे. यामध्ये मालवण भरड भाट येथील चिपकर घर रस्ता डांबरीकरण व गटार बांधकाम ( रु.६,२३,२९९) दुपारी १२ वाजता, बसस्थानक ते दलीतवस्ती रस्ता रुंदीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसवणे व डांबरीकरण (रु.१५,८१,३५९) दुपारी १२:१५ वाजता, मालवण बस स्थानक समोरील दलीतवस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण (रु.१३, ९१,९४६) दुपारी १२.३०, हॉटेल महाराजा ते दलीतवस्ती रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण (रु. २३,७६,९९६) दुपारी १२.४५ वाजता आदी कामांचा समावेश आहे. या भूमिपूजन सोहळ्यास लोकप्रतिनिधी, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page