मातोंड येथे मसाले प्रक्रिया उद्योगाला प्रारंभ…

मातोंड सरपंच तथा समूहाच्या सदस्या जानवी परब यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन

वेंगुर्ले: तालुक्यातील मातोंड येथील गणेशदिप मसाला लघु उत्पादन महिला समूह, मातोंड – वरचेबांबर यांच्यामार्फत सर्व प्रकारचे मसाले प्रक्रिया उद्योगाला प्रारंभ करण्यात आला असून या उद्योगाचे उदघाटन मातोंड सरपंच तथा या समूहाच्या सदस्य जानवी जगदीश परब यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या महिलांनी स्वतःच्या पर्यायाने समूहाच्या आर्थिक उन्नतीसाठी हा व्यवसाय सुरू करून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनौन्नती अभियान (MSRL), राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तक प्रकल्प (NRETP) अंतर्गत “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे जीवन” हा ब्रीडवाक्यानुसार महिला क्रांती ग्रामसंघ मातोंड, एकता महिला प्रभाग संघ तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने हा मसाला प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला आहे. याचा शुभारंभ सरपंच सौ परब यांच्या हस्ते येथील ग्रामदेवता श्री देवी सातेरी जत्रोत्सवाचे औचित्य साधून १८ नोव्हेंबर रोजी करण्यात आला. यावेळी प्रभाग संघ व्यवस्थापक तनुजा तुकाराम परब, उद्योगसखी नीलिमा भरत गावडे, समूहाच्या अध्यक्ष अपर्णा अजित परब, सचिव श्वेता परब, सदस्य सुमित्रा परब, सुहासिनी परब, अनिता परब, वैशाली कुबल, दीपाली परब, भाग्यश्री परब, चंद्रकला परब, छाया परब, ज्योती परब, संजना मातोंडकर, रसिका परब, सुकांती परब आदी उपस्थित होत्या. फोटो: मातोंड: मसाला उद्योग शुभारंभ वेळी उपस्थित समूहाच्या सर्व महिला

You cannot copy content of this page