Global Maharashtra Breaking News

भारतीय किसान संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

सिंधुदुर्गनगरी ता ०८ शेतकऱ्यांना शेतमाल उत्पादन खर्च ,अधिक लाभकारी मूल्य देणेबाबत कायदा झालाच पाहिजे. या मागणीसाठी भारतीय किसान संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले तर याबाबतचे निवेदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले. भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र प्रांत महामंत्री मदन देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन…

Read More

प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजन भोसले व सुभाष चव्हाण यांचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगलीकर यांनी केले स्वागत

सावंतवाडी : प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजन भोसले व माजी आमदार सुभाष चव्हाण हे सावंतवाडी दौऱ्यावर आले असताना त्यांचे काँग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगलीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगेलकर यांच्याशी काँग्रेस पक्ष वाढीबाबत चर्चा केली

Read More

गणेशोत्सव काळात नगरपरिषदेच्या अखत्यारीतील भागात चोवीस तास पाणीपुरवठा सुरू ठेवा…

अँड. राघवेंद्र नार्वेकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी* *⚡सावंतवाडी ता.०८-:* गणेश उत्सव काळात संपूर्ण शहरात तसेच नगरपरिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या भागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी कॉग्रेस शहर अध्यक्ष अँड. राघवेंद्र नार्वेकर यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी अँड संभाजी सावंत, जास्मिन लक्ष्मेश्वर, महेश चितारी, समीर भाट आदी उपस्थित होते. या निवेदनात अॅड. राघवेंद्र…

Read More

ओवळीये सडा धनगरवाडी ते हेदुळ रस्त्याची माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी स्वखर्चातून केली दुरुस्ती

*⚡मालवण ता.०८-:* गेले वर्षभर प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही दुरुस्ती न झालेल्या ओवळीये सडा धनगरवाडी ते हेदुळ या रस्त्याची मालवण पंचायत समितीचे माजी सभापती आणि गटनेते सुनील घाडीगांवकर यांनी सुमारे दीड लाख रुपये स्वखर्चातून दुरुस्ती करून ग्रामस्थांना पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. ओवळीये सडा-धनगरवाडी ते हेदूळ हा सुमारे ३ ते ४ किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्णपणे नादुरुस्त बनल्याने…

Read More

गणेश चतुर्थी सणानिमित्त वारसा हक्क प्रकरणी, वारस तपास नोंदीचे शिबिर

मालवण तालुक्यातील मंडळ अधिकाऱ्यांना दिली सूचना *⚡मालवण ता.०८-:* गणेश चतुर्थी सणानिमित्त असंख्य खातेदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या कालावधीत विशेष बाब म्हणून वारसा हक्क प्रकरणी, वारस तपास नोंदीचे शिबिर आयोजित करण्याची सूचना मालवण निवासी नायब तहसीलदार यांनी मालवण तालुक्यातील मंडळ अधिकाऱ्यांना दिली आहे. हे शिबीर दि. १३, १७ व २१ सप्टेंबर रोजी मंडळ…

Read More

महामार्गावर विविध अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कोकणवासीयांना मानवी साखळीद्वारे श्रद्धांजली

नांदगाव तिठा येथे जन आंदोलन;डॉ.दीपक परब व सुरेश मोरये यांनी केले नेतृत्व *⚡मालवण ता.०८-:* पनवेल ते झाराप या नियोजित कोकण हायवेच्या निर्मितीमध्ये होत असलेला विलंब, कामाचा निकृष्ट दर्जा,प्रलंबित कामे, नियोजनाचा आणि नागरी सुख सोयींचा अभाव यांचा निषेध नोंदविण्यासाठी कोकण हायवे समन्वय समिती आणि समृध्द कोकण संघटना यांच्यावतीने समृध्द कोकण संघटनेचे संचालक डॉ.दीपक परब आणि मुख्य…

Read More

3000 महिला मत्स्य व्यावसायिक सभासदांना माफक दरात जीवनावश्यक धान्याचे वाटप

सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मालवणचा उपक्रम *⚡मालवण ता.०८-:* सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मालवणच्यावतीने यावर्षी ही सुमारे तीन हजार महिला मत्स्य व्यावसायिक सभासदांना गणेश चतुर्थी पूर्वी माफक दरात जीवनावश्यक धान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा व मच्छिमार नेत्या सौ. स्नेहा जितेंद्र केरकर यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीच्या अनेक…

Read More

जिल्हा बँक भाजपच्या हातात जाऊ देणार नाही – राजन भोसले

*⚡सावंतवाडी ता.०९-:* आगामी काळात जिल्हा बँकेची निवडणूक होणार असून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवावी लागली तरीही आपण ती निवडणूक लढणार असून कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँक भाजपच्या हातात जाऊ देणार नाही असे स्पष्ट मत सरचिटणीस राजन भोसले यांनी व्यक्त केले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर,…

Read More

नूतन जिल्हाध्यक्ष बाळा गावडे पक्षाचा झेंडा सर्वत्र फडकवतील

प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांनी व्यक्त केला विश्वास *⚡सावंतवाडी ता.०८-:* काँग्रेस पक्षाच्या वाईट काळात जिल्ह्यातील अनेक नेते स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेस पक्ष सोडून इतर पक्षात गेले. या काळात काँग्रेस पक्ष जिल्ह्यात संपूर्ण ढासळला होता. परंतु, काँग्रेस पक्ष आता नव्याने उभारी घेत असून, जिल्हाध्यक्ष बाळा गावडे हे पक्षाचा झेंडा सर्वत्र फडकवतील असा विश्वास प्रदेश सरचिटणीस राजन भोसले…

Read More

सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे 9 ऑक्टोबर रोजी उद्‍घाटन

उद्योगमंत्री सुभाष देसाई;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतीरादित्य शिंदे उपस्थितीत राहणार;कोकणविकासास चालना *⚡मुंबई, दि.०९-:* कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्‍घाटन होणार आहे,…

Read More
You cannot copy content of this page