*⚡सावंतवाडी ता.०१-:* सावंतवाडी तालुक्यातील मळगाव जोशी-मांजरेकरवाडी येथील शेतकरी बंधूंनी वाघदरा झिरंग पाचा येथे आज गोठण जेवण कार्यक्रम साजरा केला. शेतकरीबंधू ज्या ठिकाणी आपली गुरे चरावयास नेतात. त्याठिकाणी रानटी प्राण्यांपासून आपल्या गुरांचे रक्षण व संवर्धन करणे या उद्देशाने दरवर्षी गोठण जेवणाचा कार्यक्रम करतात.
यावर्षीही जोशी-मांजरेकरवाडीतील ग्रामस्थांनी वाघदरा झिरंग पाचा येथे गोठण जेवण कार्यक्रम केला. येथील शेतकरीबंधूंनी तेथे जात सर्वप्रथम सामूहिक जेवण बनविले. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून सामूहीक गाऱ्हाणे झाल्यावर जेवणास प्रारंभ झाला. जेवणानंतर पुन्हा गाऱ्हाणे घालून प्रसाद वाटप करण्यात आले. जोशी-मांजरेकरवाडीतील लोकांनी गोठण जेवण कार्यक्रमाचा लाभ घेतला.
