Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवली-कळसुली एसटीवर पुन्हा दगडफेक

आठवड्यातील दुसरी घटना;काचेवर दगडफेक करत इसम पसार *⚡कणकवली ता.१२-:* कणकवली – कळसुली जाणाऱ्या एस. टी.वर 12 जानेवारी रोजी सकाळी 7.45 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा अज्ञाताकडून दगडफेक केल्याची घटना घडली आहे. आठवड्यातील ही दुसरी घटना असून एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू असून एसटी प्रशासनाने एसटी सुरू करण्याचा प्रयत्न केला असल्याने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मधून…

Read More

कुडाळात भाजप-मनसेचे नवीन समीकरण

*⚡कुडाळ ता.१२-:* कुडाळ येथे नगरपंचायतच्या उर्वरित चार जागांसाठी निवडणूक होत असून, या निवडणुकीत भाजपला तीन जागांवर मनसेने जाहीर पाठींबा दिला असून, एका जागेवर भाजपने मनसेला जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबतच्या स्थानिक पातळीवरील युतीची घोषणा आज भाजप कार्यालयात भाजप आणि मनसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. यावेळी तालुकाध्यक्ष विनायक राणे,, भाजप महिला जिल्हाध्यक्ष…

Read More

माडखोल येथे आज पत्रकार पुरस्कार वितरण

केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती;जिल्हा प्रेस क्लब अध्यक्ष उत्तम वाडकर यांची माहिती सावंतवाडी : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात आलेल्या पत्रकार पुरस्कारांचे वितरण बुधवारी माडखोल येथील सावंत फार्म येथे सकाळी १०.३० वाजता केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहेत. यावेळी पत्रकार जय भोसले, विश्वनाथ नाईक व…

Read More

तालुका भातपिक स्पर्धेत भक्तप्रल्हाद चव्हाण यांचा प्रथम क्रमांक

वाघवणे येथील शेतकरी मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषि विभाग, येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने सन २०२१-२२ मध्ये खरीप हंगामात घेण्यात आलेल्या भात पीक स्पर्धेत वाघवणे येथील भक्तप्रल्हाद चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. भात पीक स्पर्धेसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्यात आले. तालुक्यातील तेरा शेतकऱ्यांनी अर्ज भर होते. पिक कापणी वेळी गावपातळीवरील…

Read More

निधन झालेल्या उमेदवार सुधार चव्हाण यांच्या कुटुंबियांची नारायण राणेंनी घेतली भेट

मालवण दि प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील भाजपचे उमेदवार सुधीर चव्हाण यांचे अकाली निधन झाल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज मंगळवारी चव्हाण यांच्या मालवण आडवण येथील मूळ निवासस्थानी भेट देऊन चव्हाण कुटुंबियांचे सांत्वन केले. चव्हाण यांच्या आकस्मिक निधनाने मोठा धक्का बसलेल्या चव्हाण कुटुंबियांना ना. राणे यांनी धीर दिला. मूळ मालवण आडवण येथील रहिवासी आणि कुडाळ…

Read More

२१ जानेवारी पासून तीन दिवस एमएसएमईचे मार्गदर्शन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माहिती;उद्योग खात्याच्या विविध योजनांची देणार माहिती मालवण दि प्रतिनिधी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या संकल्पनेतून एमएसएमईचे तज्ञ मार्गदर्शक २१ जानेवारी ते २३ जानेवारी या तीन दिवसाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या मार्फत उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात येणार असून लघु सुक्ष्म आणि मध्यम उद्योग खात्यातील वेगवेगळ्या उद्योग…

Read More

इच्छा मरणाची परवानगी द्या

एसटी कर्मचाऱ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र *⚡मालवण ता.११-: राज्य शासनात एस टी चे विलनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचारी यांचा संघर्ष सुरू आहे. शासनाकडे वारंवार मागणी करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगत मालवण आगारातील एसटी कर्मचारी यांनी स्वेच्छा मरणाच्या परवानगी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत राज्यपालाना ही…

Read More

संदेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर बी एस एन एल टॉवर कार्यान्वित…

दोडामार्ग / सुमित दळवी तेरवण मेढे येथील बीएसएनल मोबाईल टॉवर १५ दिवसांपासून बंद होता,मात्र युवा सेना कार्यकर्ते संदेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेताच अखेर बंद असलेला बीएसएनल टॉवर सुरळीत केला आहे. संदेश राणे यांनी घेतलेल्या भूमिकेला शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी व रामदास मेस्त्री यांनी पाठिंबा देत संबंधित अधिकाऱ्यांला सेना स्टाईल दाखवली आहे.तात्काळ कार्यवाही करून आज…

Read More

काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती झाल्याने साक्षी वंजारी यांचा सत्कार…

काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केला सत्कार *⚡सावंतवाडी ता.११-:* सिंधुदुर्ग जिल्हा महिला जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा साक्षी वंजारी यांची नियुक्ती झाल्याने कॉग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचा आज शाल व साडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कोकणचे प्रभारी शशांक धावूसकर, माजी कोकण प्रभारी सुभाष चव्हाण, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत, ओबिसी अध्यक्ष बाळू अंधारी, दादा परब, विद्याप्रसाद बांदेकर,…

Read More

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात निर्बंध लागू

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश ⚡सिंधुदुर्गनगरी ता.११-:* कोविड-19 (ओमिक्रोन) विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना फिरण्यास बंदी राहणार आहे. या आदेशात म्हटले आहे, नागरिकांचे बाहेर फिरणे – पाच किंवा त्याहून जास्त…

Read More
You cannot copy content of this page