कळणे दुर्घटनेला दोन महिने उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई नाही…

तातडीने नुकसान भरपाई देण्याची नुकसानग्रस्त शेतकरी अभय देसाई यांची मागणी

*⚡दोडामार्ग ता.२५-:सुमित दळवी-:* कळणे येथे झालेल्या घटनेला दोन महिने होत आले तरीही तेथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही आहे. शासनाने पंचनामे केले आहेत तर अजून त्या पंचनाम्यानुसार आम्हाला भरपाई दिली नसून हे सर्व नुकसानग्रस्त गरीब शेतकरीच्या भावना सोबत खेळण्याचा प्रकार चालू आहे.आमचा सरकार वर पूर्ण विश्वास आहे आणि सरकार ने केलेलं जे काही पंचनामे असतील ते आम्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मान्य आहेत,परंतु सरकार ने लवकरात लवकर न्याय द्यावा.आज शेतकऱ्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न असताना सुद्धा आमच्या भावनाच अनादर होत आहे. उद्या कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या केल्यास कोण जबाबदार राहील ? आज कळणे गावातील नुकसानग्रस्त शेतकरी पाणावलेल्या डोळ्यांत एक स्वप्न बघत आहे त्या स्वप्नाचा नाश करण्यास कोण जबाबदार आहे ? कळणे गावातील हृदयद्रावक परिस्थिती विचारत घेऊन कोणीही आमच्या भावना सोबत खेळू नये आणि सरकार ने ह्या सर्व गोष्टींचा भावनात्मक विचार करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कळणे येथील नुकसानग्रस्त शेतकरी अभय देसाई यांनी केली आहे.

You cannot copy content of this page