अपघातग्रस्त नागरिकांची व मोडकळीस आलेल्या वाहनांची जबाबदारी पण घ्या

आमदार वैभव नाईक यांना माजी सभापती उदय परब यांचा उपरोधिक टोला

*⚡मालवण ता.२४-:* नादुरुस्त बनलेल्या रस्त्यांची जबाबदारी माझी सांगणारे आणि सदैव जनते सोबत म्हणणारे आमदार हे मतदारांच्या गाड्या खिळखिळया झाल्यात, मणक्यात गॅप झाल्यात काही अपघात ग्रस्त झालेत त्यांची जबाबदारी घेणार का? असा सवाल मालवणचे माजी सभापती उदय परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आमदार वैभव नाईक यांना केला आहे. मालवणचे माजी सभापती उदय परब यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ज्यांच्या टु व्हिलर, थ्री व्हिलर, फोर व्हिलर गाड्या कामाला आल्या त्या बाबत आमदार नाईक यांनी बोलावे. रस्ते दुरुस्ती ही जनतेच्या पैशातून होणार आहे. आपल्या खिशातून स्वखर्चाने नाही. पाच वर्षापुर्वी कांदळगाव येथील बॉडी बिल्डर स्पर्धा उद्घाटन वेळी उद्या पासुन रस्त्याचे काम सुरू होईल म्हणून रामेश्वराच्या भुमीत आपण खोटे बोललात, पण ही रामेश्वराची भुमी आहे इथे सत्यच टिकणार आणि सत्य हे आहे की गाड्या खिळखिळया व्हायला लोकांच्या मणका, पाठदुखी सारख्या आजारांना सर्वस्वी आमदार नाईक हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. कांदळगाव रस्त्यासाठी चार लाख रुपये मंजूर झाले होते. टेंडर प्रोसिजर होऊन ठेकेदाराला कामही मिळाले होते परंतु ते ज्या दिवशी प्रत्यक्ष काम करण्यासाठी आले त्यावेळी ग्रामपंचायतीला मेल आला की आपला चार लाख रुपये मंजूर असलेला रस्ता हा पावशी कुडाळ येथे फिरवला आहे. हा रस्ता रद्द करून बदल करण्याचे पाप कोणी केले हे ही जनतेला आमदारांनी सांगावे असे परब यांनी सांगून मालवण कांदळगाव मसूरे ह्या रस्त्यासाठी काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी स्वतः जाऊन सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे जाहीर केले आहे त्यापूर्वी या गावचे सुपुत्र जी एस परब यांनी गटनेते सुनील प्रभू यांच्या बरोबर महिनाभर पाठपुरावा करत होते. आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थाना पंधरा दिवसात डांबरीकरण करुन देतो म्हणून १२ फेब्रुवारीला आश्वासन दिल्यानंतर चार महिन्यात आमदारांनी डांबरीकरण केले नाहीत आणि आता ते पावसाळ्याचे कारण देत आहेत २७ फेब्रुवारी ते २७ मे पर्यंत पंधरा दिवस पुर्ण होत नाहीत का? मग खोटे आश्वासन ग्रामस्थांना देऊन फसवणूक का केली ?असा सवाल उदय परब यांनी केला आहे

You cannot copy content of this page