एक जागीच ठार तर दुसरा गंभीर जख्मी
*⚡मालवण ता.२४-:* मालवण कसाल हमरस्त्यावरील चौके बाजारपेठ येथे चौकेच्या दिशेने येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने आपल्या ताब्यातील ऍकसेस नावाची दुचाकीची विद्युत खांबाला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे तर दुचाकीवरील दुसरा सहकारी गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे ही घटना आज रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार ,अपघातग्रस्त दुचाकीमध्ये आढळलेल्या साहित्यात एक आधार कार्ड सापडले असून त्या आधार कार्डवर सबनीसवाडा सावंतवाडी हा पत्या आहे रात्रौ उशिरा पर्यंत मयताच्या ओळख पटलेली नाही या अपघाताची माहिती मिळताच सरपंच राजा गावडे, संतोष गावडे, नितीन गावडे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.
